११ जुलै रोजी IMA चंद्रपूरकडून २४ तासांची एकदिवसीय दवाखाने वआरोग्य सेवा बंद







११ जुलै रोजी IMA चंद्रपूरकडून २४ तासांची एकदिवसीय दवाखाने वआरोग्य सेवा बंद

 ◾महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल  च्या वादग्रस्त निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन

 चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) चंद्रपूर शाखेच्या वतीने कळविण्यात येते की, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC) ने दिनांक ३० जून २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. या अधिसूचनेनुसार केवळ एका वर्षाच्या Certificate Course in Modern Pharmacology (CCMP) चा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना MMC मध्ये नोंदणीस परवानगी देण्यात आली आहे – जो निर्णय वैद्यकीय शिक्षण, दर्जा व नैतिकतेच्या पूर्ण विरोधात आहे.

IMA चंद्रपूर व महाराष्ट्र राज्याच्या वतीने हा निर्णय रुग्णांच्या आरोग्यावर गभीर धोका निर्माण करणारा, वैद्यकीय व्यवसायाच्या व्यावसायिकतेचा अवमान करणारा, आणि आधुनिक वैद्यकीय शिक्षण प्रणालीचा अपमान करणारा आहे.

याविरोधात IMA चंद्रपूर शाखेमार्फत ११ जुलै २०२५ रोजी गुरुवारी  सकाळी आठ पासून  एकदिवसीय हॉस्पिटल व आरोग्य सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती : या आंदोलनाच्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती केली जाणार असून या निर्णयाचे संभाव्य दुष्परिणाम अधोरेखित केले जातील. वैद्यकीय क्षेत्रातील असंतोष लक्षात घेता ही अधिसूचना शासनाने तात्काळ मागे घ्यावी, अशी IMA ची ठाम मागणी आहे. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी IMA डॉक्टरांनी सर्व रुग्णांची अडचण झाल्यास दिलगिरी व्यक्त केली आहे.

प्रमुख पदाधिकारी व डॉक्टरांची भूमिका : डॉ. रितेश दीक्षित – अध्यक्ष, IMA चंद्रपूर,डॉ. मंगेश गुलवाडे – माजी उपाध्यक्ष, IMA महाराष्ट्र,डॉ. सुश्रुत भुकते – सचिव, IMA चंद्रपूर

तसेच डॉ. दीपक निलावार, डॉ. नरेंद्र कोलते, डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. प्रसाद पोटदुखे, डॉ. अनुप पालीवाल, डॉ. भूपेश भलमे, डॉ. नगीना नायडू, डॉ. सुधीर रेगुंडवार, डॉ. स्नेहल पोटदुखे, डॉ. हर्ष मामीडवार, डॉ. अभय राठोड, डॉ. राहुल सैनानी, डॉ. अप्रतिम दीक्षित यांच्यासह सर्व सदस्य यांचाही या आंदोलनात सक्रिय सहभाग आहे.

IMA चंद्रपूर शाखेने स्पष्ट केले आहे की,जर शासनाने सदर अधिसूचना तात्काळ मागे घेतली नाही, तर लोकशाही मार्गाने संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. हाच निर्धार घेऊन आम्ही आरोग्य व्यवस्था, वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता आणि जनतेच्या हितासाठी ही लढाई पुढे नेणार आहोत.




Post a Comment

0 Comments