ILLEGAL WEAPON SEIZED ब्रम्हपुरी येथे अवैध अग्नीशस्त्र (गावठी कट्टा) व काडतूस सहा दोन आरोपी अटक

 



ILLEGAL WEAPON SEIZED

ब्रम्हपुरी येथे अवैध  अग्नीशस्त्र ( गावठी कट्टा ) व काडतूस सहा दोन आरोपी अटक 

◾एक नग देशी बनावटीचा गावठी कट्टा व दोन नग काडतूस

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक १९/०७/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथक पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे अवैध व्यवसायाविरुध्द कारवाई करीता पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीशिर बातमीवरुन मौजा किन्ही गावात संशयीतांचे घरी पंचासमक्ष छापा टाकला असता आरोपी नामे (१) गणेश उर्फ गोलू बक्षी सोनवणे वय २६ वर्ष रा. किन्ही ता. ब्रम्हपुरी याचे ताब्यात एक नग देशी बनावटीचा गावठी कट्टा व दोन नग काडतूस अवैधरित्या मिळून आले याबाबत त्यास विचारणा केली असता सदर गावठी कट्टा व काडतूस त्यास आरोपी क्रमांक (२) अक्षय भजनदास शेंडे वय २९ वर्ष रा. मालडोंगरी ता. ब्रम्हपुरी याने दिल्याचे सांगितल्याने दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेवुन पंचनामा कारवाई करुन त्यांच्या विरुध्द भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५ अन्वये गुन्हा नोंद करुन आरोपीतांना पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मुम्माका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, पोहवा / सचिन गुरनुले, पोअं / गणेश भोयर, पोअं/ अजित शेन्डे, पोअं/ नितेश महात्मे, पोअं/मिलींद जांभुळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.




Post a Comment

0 Comments