२७ तारखेला जिल्ह्यातील २१ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा

 



२७ तारखेला जिल्ह्यातील २१ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा

◾पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्त्या मालू यांची माहीती

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : फ्रेंड्स चॅरिटी ग्रुप, मानवाधिकार आणि सामाजिक न्याय आयोग, कै. माधवराव मेश्राम आदिवासी बहु. संस्थेच्या वतीने २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पोंभुर्णा तहसील येथील सुमन मंगल कार्यालयात आदिवासी विवाह सामुहिक समारोह २०२५ आयोजित करण्याबाबत सामाजिक कार्यकर्त्या आणि फ्रेंड्स चॅरिटी ग्रुपच्या अध्यक्षा सरिता मालू यांनी माहिती दिली. या सामूहिक विवाह सोहळ्यात लोकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्वर्गीय माधवराव मेश्राम आदिवासी बहु. संस्थेचे अध्यक्ष राकेश मेश्राम, आदिवासी बहु. संस्थेचे अध्यक्ष दामोधर सुक्रू सेमले, संस्था खजेंद्र सेमले पत्रकार परिषदेत उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments