डिझेलचा अवैध साठा ठेवणाऱ्या आरोपी अटक; पोलीस स्टेशन राजुरा ची कामगिरी

 






डिझेलचा अवैध साठा ठेवणाऱ्या आरोपी अटक; पोलीस स्टेशन राजुरा ची कामगिरी

◾४ मोठ्या प्लॉस्टीक कॅन मध्ये एकुण १२० लिटर डिझेल किंमत १०,८००/- रुपयाचा माल जप्त 

◾एका पडीत रुम मध्ये डिझेलचा अवैध साठा ठेवणाऱ्या गुन्हा दाखल 

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक १२ जुलै, २०२५ रोजी राजुरा पोलीसांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन पो.स्टे. हद्दीतील पौनी जिल्हा परिषद शाळे जवळील एका पडीत रुम मध्ये पंचासमक्ष छापा टाकला असता सदर ठिकाणी ४ मोठ्या प्लॉस्टीक कॅन मध्ये एकुण १२० लिटर डिझेल किंमत १०,८००/- रुपयाचा माल अवैध रित्या साठवणुक करुन ठेवल्याचे मिळुन आल्याने साठवणुक करणारा इसम नामे अमृतकुमार राजकुमार राजभर वय २८ वर्ष रा. पौनी, राजुरा याचेविरुध्द अपराध क्रमांक ३२३/२०२५ कलम २८७ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन आरोपी अटक करुन त्याचे ताब्यातील एकुण १०,८००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक  ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांचे नेतृत्वात सपोनि हेमंत पवार, पोउपनि चाटे, परि. पोउपनि सुवर्णा काळे, पोहवा /१२९४ संजय, पोअं/१७८७ पोले सर्व पोलीस स्टेशन राजुरा यांनी केली आहे.




Post a Comment

0 Comments