जंगली डुक्कर, एक भरमार बंदुक (अग्नीशस्त्र), दारुगोळा व इतर वस्तु सह आरोपींना अटक

 



जंगली डुक्कर, एक भरमार बंदुक (अग्नीशस्त्र), दारुगोळा व इतर वस्तु सह  आरोपींना अटक 

 ◾वन्य प्राण्यांची शिकार करणारे दोन इसम ताब्या

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक १८ जुलै २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथकास मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी हद्दीत रेल्वे क्रॉसींग ब्रम्हपुरी-आरमोरी रोडवर सापळा रचुन मोपेड वाहनावर वन्य प्राण्यांचे शिकार करुन चोरटी वाहतुक करणारे इसम नामे (१) कुंदनसिंग शेरसिंग भुराणी वय ३१ वर्ष, (२) विजयसिंग सुरतसिंग भुराणी वय २१ वर्ष दोन्ही रा.पेठ वार्ड ब्रम्हपुरी यांना पकडुन त्यांचे ताब्यातील शिकार केलेले वन्य प्राणि ०३ मृत जंगली डुक्कर, एक भरमार बंदुक (अग्नीशस्त्र), दारुगोळा व इतर वस्तु सह नमुद दोन्ही आरोपींविरुध्द वन्य प्राणि संरक्षण अधिनियम आणि शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करणे कामी वन विभाग यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंभोरकर, पोअं. गणेश भोयर, अजित शेंडे, नितेश महात्मे, प्रदीप मडावी सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर.




Post a Comment

0 Comments