बल्लारपुर तहसीलदार शेतकऱ्यांचा रस्त्याचा वाद बांधावर जाऊन आपसी सहमतीने वाद मिटविला.

 





बल्लारपुर तहसीलदार शेतकऱ्यांचा रस्त्याचा वाद बांधावर जाऊन आपसी सहमतीने वाद मिटविला.

◾बल्लारपूर तालुक्यातील मानोरा शेतकऱ्यांच्या रस्ता वाद समबंधाने तहसीलदार  श्रीमती.रेणुका कोकाटे रस्ता वाद समबंधाने मौका पाहणी केली. 

◾शेतकऱ्यांचा रस्त्याचा वाद तहसीलदार श्रीमती.रेणुका कोकाटे यांनी बांधावर जाऊन आपसी सहमतीने वाद मिटविला.


बल्लारपुर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : बल्लारपूर तालुक्यातील मौजा-मानोरा येथील शेतकऱ्यांना त्यांचे शेताची वहिवाट करण्यासाठी बरेच दिवसापासून शेतकऱ्यांमध्ये शेताच्या हद्दीवरुन वाद होता. 

ग्राम महसूल अधिकारी, मानोरा यांनी शेतकऱ्यांच्या रस्ता वाद समबंधाने तहसीलदार बल्लारपूर यांना माहिती दिली. सद्या तालुक्यामध्ये धान पेरणी सुरु असून कोणत्याही शेतकर्यांना वहिवाट करण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये याकरीता विषयाची गँभिरता लक्षात घेऊन आज दि.17 जुलै 2025 रोजी शेतकरी सर्वश्री. तेजराव पिपरे, बाळकृष्ण पिपरे, मनोज बुरांडे, फरीदास पिपरे, नंदकीशोर शेट्टे, विलास पिपरे व इतर शेतकरी ग्राम महसूल अधिकारी श्री.प्रकाश कंमलवार, नायब तहसिलदार श्री. महेंद्र फुलझेले यांचेसह रस्ता वाद समबंधाने मौका पाहणी केली. 

वादातील रस्त्यालगत सरकारी नाला असून लगतच्या शेतकऱ्यांनी सरकारी नाल्याची जमीन वापरात घेतली असल्याचे मौक्यावर दिसून आल्याने सर्व शेतकऱ्यांनी जमीन मोजणीसाठी अर्ज सादर करावा अशी सूचना केली. 

सरकारी जमिनीची हद्द निश्चित झाल्यानंतर कायमचा रस्ता मंजूर करण्यात येईल असे तहसीलदार बल्लारपूर श्रीमती. रेणुका कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सांगितले. रस्त्याचा वाद अंतिमतः निकाली निघे पावेतो कोणत्याही शेतकऱ्यांनी कुणाचाही वहिवाटीचा रस्ता अडवू नये, अशी सूचना केली, यावर सर्व उपस्थित शेतकर्यांनी  सहमती दर्शविली. तहसीलदार महोदयांनी बांधावर येऊन आपसी सहमतीने रस्त्याचा वाद मिटविल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.




Post a Comment

0 Comments