नविन इलेक्ट्रीक लोखंडी पोल उभारणी प्रकरणी फसवणुक करणारे तीन इसम अटक; 21,65,194/- रु. चा माल जप्त
◾एकुण 114 इलेक्ट्रीक लोखंडी पोल आणि गुन्हयात वापरलेले वाहने असा एकुण 21,65,194/- रु. चा माल जप्त
◾फिडर सेपरेशन ईलेक्ट्रीक पोल उभे करुन तर जोडणीचे काम
◾पोलीस स्टेशन नागभीड ची कामगिरी
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक ५/७/२०२५ रोजी फिर्यादी विक्रमसिंग वृजेंद्रसिंग वय ४२ वर्ष रा. माजिगावाहन ता. मनगवा जि. रिवा (म.प्र.) ह.मु. ब्रम्हपुरी यांनी पो.स्टे. नागभीड येथे रिपोर्ट दिला की, अशोका बिल्डकॉन लि. नाशिक कंपनीचा गडचिरोली सर्कल अंतर्गत ब्रम्हपुरी डिव्हीजन मधील नागभीड तालुक्यात अनेक ठिकाणी नविन इलेक्ट्रीक लोखंडी पोल उभे करुन तार जोडणीचे (RDSS T-10) काम मिळाले होते.
अशोका बिल्डकॉन लि. नाशिक कंपनीने नागभिड तालुक्यातील काम मिंडाळा ते किटाळी मेंढा फिडर सेपरेशन ईलेक्ट्रीक पोल उभे करुन तर जोडणीचे काम मे. प्रकाश एंटरप्रायझेस चे मालक प्रो. अजयकुमार बृजकिशोर मिश्रा रा. एपीएसयु रोड पुरैन ता. सनौरा जि. रिवा यांना देवुन त्याबाबत वर्कआर्डर आणि त्यांच्या कंपनीनेचे गडचिरोली डिपो मधुन दि.७/२/२२०५ रोजी १०० नग व दि. ३/३/२०२५ रोजी ९० नग लोखंडी इलेक्ट्रीक पोल (९ मिटर लांबीचे) असे एकुण १९० पोल दिले असता.
त्यांनी एकुण १२७ नग लोखंडी पोल किं. १२,९८,१५०/- रुपयाचे परस्पर विल्हेवाट लावुन अशोक बिल्डकॉन लि. नाशिक कंपनीचा अन्यायाने विश्वासघात करुन फसवणुक केली. यावरुन अप.क्र. २१३/२०२५ कलम ३१६ (२), ३१८ (४) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हयाचा तपास नागभिड पोलीसांनी गुन्हयातील आरोपी नामे (१) अजयकुमार मिश्रा रा.रिवा (म.प्र.) (२) गेंदलाल गुहाराम शाहु रा. बिटाल (छत्तीसगड) (३) ट्रेलर ट्रक चालक धनराज तोडेलाल सुर्यवंशी रा. नागपूर यांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर आणि दिनकर ठोसरे उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रम्हपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे नागभीड चे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांचे नेतृत्वात सपोनि दिलीप पोटभरे, पोहवा दिपक कोडापे, पोहवा विनोद गायकवाड, पोअं भरत घोळवे, पोअं अवधुत खोब्रागडे, पोअं जय रोहणकर, पोअं विक्रम आत्राम सर्व पोलीस स्टेशन नागभीड यांनी केली आहे.
0 Comments