चंद्रपूर शहरातील महानगरपालिका सांडपाणी योजना पारदर्शक करा
◾अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करू.
◾पत्र परिषदेत सामाजिक कार्यकर्ते आनंद इंगळे यांचा इशारा
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : यापूर्वी शहरात मनपा 100 कोटी रुपयांची सांडपाणी योजना राबवण्यात आली होती, परंतु ती अयशस्वी ठरली. आता पुन्हा 542 कोटी रुपयांची चंद्रपूर शहरातील महानगरपालिका सांडपाणी योजना राबवली जात आहे. जर ही योजना मागील योजनेप्रमाणे अपयशी ठरली तर त्याला कोण जबाबदार असेल असा प्रश्न विचारत सामाजिक कार्यकर्ते आनंद इंगळे यांनी ही योजना पारदर्शक करावी आणि शहरातील लोकांना सांडपाणी योजनेची माहिती द्यावी अशी मागणी केली आहे, अन्यथा या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते इंगळे यांनी दिले आहेत.
इंगळे म्हणाले की, यापूर्वी १०० कोटी रुपयांच्या सांडपाणी योजनेअंतर्गत रस्ते खोदण्यात आले होते. ज्यामुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांवर धूळ आणि खड्डे तयार झाले. रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. पण त्यावेळी शहरातील लोक शहराच्या विकासाबाबत शांत होते. परंतु ही योजना अयशस्वी झाल्यानंतर, नागरिकांना अनेक वर्षे या समस्येचा सामना करावा लागला. आता पुन्हा 542 कोटी रुपयांच्या सांडपाणी योजनेसाठी रस्ते खोदले जात आहेत. ही योजना पारदर्शक करण्यासाठी, महापालिका प्रशासनाने शहरात बॅनर किंवा पोस्टर लावून या योजनेची सर्व माहिती द्यावी. तसेच, अयशस्वी झालेल्या 100 कोटी च्या सांडपानी योजने ची माहिती जनतेला द्यावी तोपर्यंत नवीन सांडपाणी योजनेचे काम थांबविण्यात यावे अशी मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्यास न्यायालयात याचिका दाखल केली जाईल असा इशारा आनंद इंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.
0 Comments