आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतले श्री चैतन्य कानिफनाथ महाराज पालखीचे दर्शन
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : श्री चैतन्य कानिफनाथ महाराज सरोदी समाज संघटना चंद्रपुर, च्या वतीने इंदीरानगर येथे श्री कानिफनाथ जन्मोत्सव (पंचमी) यात्रा व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार पालखीचे दर्शन घेत पालखीत सहभागी झाले.
यावेळी श्री चैतन्य कणिकनाथ महाराज सरोदी समाज संघटणेचे भास्कर भोयर, कैलाश गदाई, पाडुरंग भगाडे, शुभाष साकुरे, कुंजीलाल मोरे, अनिता गदाई, संगीता भगाडे, जमाना भोयर आदींची उपस्थिती होती.
दरवर्षी प्रमाणे यंदा ही श्री चैतन्य कानिफनाथ महाराज सरोदी समाज संघटना चंद्रपुर, च्या वतीने इंदीरानगर येथे श्री कानिफनाथ जन्मोत्सव (पंचमी) यात्रा व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंदिरा नगर येथून पालखी काढण्यात आली. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी श्री चैतन्य कानिफनाथ महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन वंदन केले. यावेळी निघालेल्या पालखीत आमदार किशोर जोरगेवार हे ही सहभागी झाले होते. यावेळी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .
0 Comments