13 व चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी 11 नामनिर्देशन पत्र दाखल
◾26 मार्च रोजी चंद्रपूर लोकसभा मतदार संघाकरीता नामांकन अर्ज दाखल करणाऱ्यांनाचा उमेदवारांचे नाव
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 मार्च 2024 रोजी 7 उमेदवारांनी 11 नामनिर्देशन पत्र दाखल केले.
आज मंगळवार, दि. 26 मार्च रोजी विनोद कवडूची खोब्रागडे ( अपक्ष ), अशोक राणाजी राठोड ( जय विदर्भ पाटी ), अवचित श्यामराव सयाम ( जनसेवा गोंडवाना पाटी ), मधूकर विठ्ठल निस्ताने यांनी 2 अर्ज ( प्राऊटिस्ट ब्लॉक इंडिया ), धानोरकर प्रतिभा सुरेश ( भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ), मुनगंटीवार सुधीर सच्चिदानंद यांनी 4 अर्ज ( भारतीय जनता पार्टी ) आणि अतुल अशोक मुनगीनवार ( अपक्ष ) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मंगळवारी 16 इच्छूकांनी अर्जाची उचल केली आहे.
नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा उद्या बुधवार शेवटचा दिवस आहे. उद्या सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. 28 मार्च रोजी नामनिर्देशनपत्रांची छानणी करण्यात येणार आहे. 30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
0 Comments