मोबाईल जबरीने हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपींना चंद्रपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासात 3 आरोपींना अटक केली .
◾एकूण 76999/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय शिक्षण घेणारा विद्यार्थी बायपास मार्गाने ( इंजीनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थी ) ट्युशनला जात असताना त्याचा मोबाईल जबरीने हिसकुन पळ काढणाऱ्या आरोपींना चंद्रपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासात अटक केली. आरोपींचा नाव राहुल जगदीश पिल्ले वय (23) वर्ष रा. नेरी वार्ड, दुर्गापुर, रोहन शंकर वाठोरे (20) वर्ष, आदित्य शालीक गोमासे वय (22) वर्ष दोघेही राहणार एकता चौक, दुर्गापुर, चंद्रपूर या तीन आरोपींना अटक केली असून एकूण 76,999 /- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय शिक्षण घेणारा विद्यार्थी दिनांक 4 मे रोजी सायंकाळी 5 वाजता अभियांत्रिकी वस्तीगृहातून बायपास मार्गे पायदळ ट्युशन ला जात असतांना बजाज विद्याभवन जवळ इव्हेजर मोटरसायकल वाहनाने तिघे जण त्याचे जवळ जात "मुझे कॉल करना है, मोबाईल दो" असे म्हणाला त्यावर मला ट्युशनला उशीर झाला, दुसऱ्या कोणाला मोबाईल मागा, असे विद्यार्थिनी उत्तर दिल्यावर मोटरसायकलवर मधात बसलेला आरोपींने विद्यार्थाच्या हातातील रियलमी 10 प्राईम मोबाईल हिसकावून मोटरसायकलने पडून गेल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी शहर पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दिली.
शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 303/2023 कलम 392, 34 भांदवि गुन्हा नोंद करुन तपास सुरू करण्यात आला.
घटनेचे गंभीर लक्षात घेता सापोनि रमिझ मुलांनी व डीबी पथक घटनास्थळी पोहचून सीसीटीव्ही फुटेज तपासून शोध सुरू केला असता लालपेठ परिसरात एका मोटरसायकलवर तीन युवक फिरत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सापळा रचून तीन्ही आरोपांना अटक केली.
यात आरोपीकडून हिसकावलेला रियलमी कंपनीचा मोबाईल किंमत 16,999 /- रुपये व गुन्ह्यात वापरलेली बजाज एव्हेंजर किंमत 60,000/- रुपये असा एकूण 76999/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार याचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश सिंह राजपूत तसेच स.पो.नि. रमीझ मुलांनी, सपनि. मंगेश भोंगाडे यांचे नेतृत्वात गुन्हे शोध पथक कर्मचारी स.फौ. शरीफ शेख, पोहावा विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, जयंत चूनारकर, सचिन बोरकर, संतोष पंडित, चेतन गज्जलवार, इमरान शेख इमरान, इशाऺद खान, दिलीप कुसनाके, संतोष कावळे, रुपेश रणदिवे यांनी केली.
0 Comments