WCL वेकोलिमुळे चंद्रपूर,बल्लारपूर, राजुरा तालुक्यातील गावांना बसणार पुराचा फटका!




WCL वेकोलिमुळे चंद्रपूर,बल्लारपूर, राजुरा तालुक्यातील गावांना बसणार पुराचा फटका! 

◾WCL बल्लारपूर क्षेत्रातील  धोपताला खुल्या खाणीतून मोठ्या प्रमाणात मातीच्या ढिकाऱ्यांमुळे बल्लारपूर शहरातील वस्ती विभागाला  पुराचा फटका! 


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : WCL  बल्लारपुर वेकोलिद्वारे धोपताला खुल्या खाणीतून मोठ्या प्रमाणात उत्खननाचे काम करण्यात  येत  असून त्यातून  निर्माण करण्यात येत असलेल्या कृत्रिम मातीच्या ढिकाऱ्यांमुळे बल्लारपूर शहरासह अनेक गावांना येत्या पावसाळ्यात  पुरामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 माहितीनुसार  वेकोलिव्दारे हस्तांतरित करण्यात आलेल्या जमिनीतून मोठ्या प्रमाणात खुल्या खाणीतून माती उत्खनन करण्यात येत आहे.  ती काढलेली माती वर्धा नदीच्या पात्राला लागून असलेल्या कोलगाव व सास्ती येथील  शेत जमिनीत टाकण्यात येत असल्याने येणाऱ्या पावसाळ्यात नदीला  पुराचा धोका बळावला असल्याची शक्यता बल्लारपूर शहरातील वस्ती विभागातील नागरिकाद्वारे व्यक्त करण्यात येत आहे. 

टाकण्यात येत असलेली माती ही नदीपात्रापासून जवळपास  १०० मीटर दूर टाकण्याचा नियम असतांनाही सदर माती नदीच्या पात्राला लागूनच टाकण्यात  येत असल्याने मागील वर्षी पर्यंत पुराचे जे पाणी कोलगांवाच्या दिशेने जावून तेथील शेतीतील उभी पिके पाण्याखाली जात होती. 

परंतू मातीच्या ढीगाऱ्यांमुळे ते पाणी बल्लारपूर, राजुरा, चंद्रपूर शहरा लगत असलेल्या सखल भागात शिरून पूर्वी पेक्षा जास्त प्रमाणात आर्थिक व जीवितहानी होण्याची  शक्यता  बळावली आहे. 

तेलंगणा शासनाने महाराष्ट्राच्या सीमेवरील सिरोंचा तालुक्यातील  प्राणहिता, गोदावरी व पैनगंगा या नदीवर मेडीगट्टा येथे जवळपास ८० दरवाजे असलेला  धरणाची निर्मिती केली असल्यामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी या धरणात अडवण्यात आल्याने जे पुराचे पाणी नदी वाटे समुद्रा वाहते व्हायचे ते या धरणामुळे थांबल्याने जवळपास १० ते १२ वर्षानंतर म्हणजेच मागील वर्षी या भागात पुराचे पाणी वाढून पूरपरिस्थी निर्माण झाली होती. 

पण या वर्षी वेंकोलीद्वारे खुल्या खाणीतून उत्खनन करण्यात येत असलेली माती वर्धा नदीच्या तीरावर टाकण्यात येत असल्याने बल्लारपूर शहराच्या पलीकडे असलेल्या कोलगांवच्या व सास्तीच्या  दिशेने जाणारे पुराचे पाणी मातीच्या ढिगाऱ्यांमुळे बल्लारपूर शहरातील वस्ती विभागातील सखल भागातील लोकवस्ती तसेच चंद्रपुरातील सखल भाग व त्याच्या परिसरातील गावात त्याचप्रमाणे राजुरा  येथील सखल भागाला पुराच मार बसण्याची  शक्यता अधिक असल्याचे  वर्तविले जात आहे. तसेच शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संबंधित अधिकारी लक्ष द्यावे असा  नागरिकांची मागणी आहे.



Post a Comment

0 Comments