राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या




राहत्या घरी  गळफास घेऊन आत्महत्या

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातील गन्नूरवार चौकात राहणाऱ्या वृद्ध व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  घटना आज दिनांक 28 एप्रिल शुक्रवार रोजी सकाळी 7: 00 वाजता उघडकीस आली. दिलीप रागीट वय 62 वर्ष असे आत्महत्या केलेले इसमाचे नाव आहे.

बाबुपेठ परिसरातील गन्नूरवार चौकात राहणारे दिलीप रागीट आधी किराणा दुकान व्यवसाय होते, आता दुकान बंद झाल्याने मानसिक तनावाने आत्महत्या केली अशी माहिती आहे.

दोन मजली घरात ते खाली राहत होते तर त्यांच्या मुलाचे कुटुंब दुसऱ्या मजल्यावर राहत होते. राहत्या घरी गळफास घेऊन दिलीप रागीट यांनी आपली जीवन यात्रा संपवली.

शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृतदेह उत्तरीयतपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.



Post a Comment

0 Comments