हंसराज अहीर यांच्या यशस्वी मध्यस्थीने WCL ( वेकोलि ) ग्रॅन्डसनचा प्रलंबित असलेला नोकरीचा मार्ग अखेर मोकळा

 





हंसराज अहीर यांच्या यशस्वी मध्यस्थीने WCL ( वेकोलि ) ग्रॅन्डसनचा प्रलंबित असलेला नोकरीचा मार्ग अखेर मोकळा

◾ग्रॅन्डडॉटरच्या नोकरीकरीता प्रयत्नशिल - हंसराज अहीर

 चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या यशस्वी हस्तक्षेपामुळे वेकोलि प्रकल्पग्रस्तांशी संबंधित ग्रॅन्डसन ( नातू ) यांच्या नौकरीचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला असून वेकोलि मुख्यालयाने या आशयाचे निर्देश नागपूर, चंद्रपूर, वणी, वणी नॉर्थ, बल्हारशाह, माजरी, उमरेड, पेंच, पाथाखेडा आदि क्षेत्रीय कार्यालयांना जारी केले असल्याने आता ग्रॅन्डसनचा नौकरीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाबद्दल हंसराज अहीर यांनी समाधान व्यक्त केले असले तरी ग्रॅन्डडॉटर ( नात ) संबंधात वेकोलि प्रबंधनाने निर्णय घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली आहे.

या प्रमुख मागणीला व प्रकल्पग्रस्तांच्या अन्य न्यायोचित मागण्यांना घेवून हंसराज अहीर यांनी ३० ऑक्टोबर २०२२ रोजी वेकोलि नागपूर मुख्यालयात वेकोलि अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक, कार्मिक निदेशक व अन्य वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवून ग्रॅन्डसन विषयक नोकऱ्यांचे प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सुचना केल्या होत्या. यावेळी वेकोलि अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक यांनी संचालक मंडळाची ( बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑफ डब्ल्युसिएल ) मान्यता घेवून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन हंसराज अहीर यांना दिले होते.

सदर आश्वासानानुसार संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये १६ डिसेंबर २०२२ रोजी ग्रॅन्डसनच्या नौकरी संदर्भात सर्वानुमते निर्णय घेवून त्यांना वेकोलि प्रकल्पग्रस्त या नात्याने नोकरीत घेण्याचे निर्देश वेकोलि मुख्यालय नागपूर महाप्रबंधक पी अॅन्ड आय. आर. यांनी पत्र क्र. वेकोलि /औसं/एलओ/२०२३ / २२४० दि १४ फेब्रुवारी २०२३ अन्वये जारी केले असून हंसराज अहीर यांच्या प्रभावी हस्तक्षेपामुळे मागील काही वर्षांपासून रेंगाळत असलेला ग्रॅन्डसनच्या नौकरीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. प्रकल्पग्रस्तांनी हंसराज अहीर यांच्या या योगदानाबद्दल त्यांचे विशेष आभार मानत अभिनंदन केले आहे. दरम्यान वेकोलि प्रकल्पग्रस्तांच्या मुलांच्या मुलांचा ( ग्रॅन्डसन ) प्रश्न मार्गी लागला असला तरी वेकोलि मधील इतर मागासवर्गीय व अन्य प्रकल्पग्रस्तांच्या मुलांच्या मुलीचा ( ग्रॅन्डडॉटर ) नौकरीचा प्रश्नही मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करुन न्याय मिळवून देवू अशी भूमिका हंसराज अहीर यांनी या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली आहे.




Post a Comment

0 Comments