एसटी बस पलटली या अपघातात दोघांचा जागीच ठार





एसटी बस  पलटली या अपघातात दोघांचा जागीच ठार

◾6  प्रवासी गंभीर जखमी

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : धक्कादायक घटना आज सोमवारी सकाळी 8:30  सुमारास  मुल तालुक्यातील  बोरचांदली  नदीजवळ दुचाकीला अपघात झाल्यानंतर बस पलटली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. संदीप रामदास कोकोडे वय (28), प्रफुल उर्फ भाऊराव गुरुनुवले वय (24) असे मृतकाचे नाव आहे. यात बसमधील सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना ग्रामीण रुग्णालय मुल येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

मूल  तालुक्यातील फिस्कुटी येथील संदीप रामदास कोकोडे वय (28), प्रफुल उर्फ भाऊराव गुरनुले वाय (24) हे MH 34 CA 3704 या दुचाकी वाहने मूल येथील राईस मिल जात असताना एसटी परिवाहन विभागा बस क्र. MH 07 C 9158 ही मूल वरून चामोर्शीला जात असताना नदीजवळ पलटी झाल्याने त्या बस खाली आल्याने  दोघेही जागीच ठार झाल्याची घटना घडली.

घटनास्थळावर पोलीस पोहचून शवउत्तरिय तपासणीसाठी मुल उपजिला रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पुढील तपास मुल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



Post a Comment

0 Comments