बल्लारपूर नगर परिषद चे कार्यालय बचत भवन येथे स्थानांतरित करा - शहर विकास आघाडीची मागणी

 



बल्लारपूर नगर परिषद चे कार्यालय बचत भवन येथे स्थानांतरित करा - शहर विकास आघाडीची मागणी

◾बल्लारपूर शहर विकास आघाडी तर्फे तिर्वा आंदोलनाचा इशारा

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर नगरपरिषद चे जुने कार्यालय पाडून नवीन इमारत करण्यात येणार आहे. त्यामुळे नगरपरिषद चे कार्यालय पेपर मिल काटा गेट जवळ असले सुभाष चंद्र बोस शाळेत येथे हलविण्यात आले. या शाळेतील एक किलोमीटर दूर कन्नमवार नगर येथील विजयालक्ष्मी पंडित शाळेत हलविण्यात आले. त्यामुळे सुभाष चंद्र बोस शाळेत शिक्षण येणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. नगरपरिषद चे कार्यालय मध्यवर्ती भागात नसल्यामुळे कॉलरी, गोरक्षण वॉर्ड व बी टी एस प्लॉट परिसरातील नागरिकांना घर टॅक्स भरण्यास किंवा जन्म मृत्यूचे दाखले प्राप्त करण्यास खूप त्रासाचे झाले असून,आर्थिक त्रासाचे झाले आहे. 

नगरपरिषद बल्लारपूरचे कार्यालय चे पाठीमागे चालीस पचास वर्षापासून आठवठी बाजार भरत होता या बाजारातील दुकानदाराकडून नगरपरिषद दरवर्षी लाखो रुपयात कर वसूल करते,करोडो रुपयांच्या महसूल नगरपरिषद बल्लारपूर प्राप्त होऊन सुद्धा आठवडी बाजार पोलीस स्टेशन पासून डॉ.आंबेडकर भवन पर्यंत डांबरी मार्गावर भरतो. त्यामुळे बाजारात येणारे नागरिक व दुकानदारांच्या गंभीर अपघात होऊ शकते. नगरपरिषद तर्फे आठवडी बाजाराचे समस्येबाबत दुर्लक्ष केले या गंभीर घटनेबाबत बल्लारपूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष भारत थुळकर,नसीर बक्ष, विजय कुरील,ईश्वर देशभ्रतार, नामदेव खोब्रागडे,एहसान खान,इत्यादींनी नगरपरिषद चे उपमुख्यअधिकारी जयंत काटकर यांना निवेदन सादर करून व त्याच्या प्रती तहसीलदार स्नेहल रहाटे व पोलीस निरीक्षक श्री. उमेश पाटील यांना सादर करून बल्लारपूर नगर परिषद चे कार्यालय बचत भवन येथे स्थानांतरित करण्यात यावे. आठवडी बाजारा करिता मध्यवर्ती जागा करून,आठवडी बाजाराची व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली.निवेदनाची दखल न घेतलास बल्लारपूर शहर विकास आघाडी तर्फे तिर्वा आंदोलन छेडत्या येईल असा इशारा दिला.



Post a Comment

0 Comments