बल्लारपूर तहसिलचे भरारी पथकाकडून अवैध रेतीची विना परवाना दोन हायवा ट्रकला जप्त केले





बल्लारपूर तहसिलचे भरारी पथकाकडून अवैध  रेतीची विना परवाना  दोन हायवा ट्रकला जप्त केले 

◾दोन्ही वाहन तहसील बल्लारपूर येथे जमा

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर तालुका हद्दीतील मानोरा व कारवा रोडवर दि.16/02/2023 रोजी मध्यरात्री  1.30 ते 3.30 वाजे दरम्यान रात्री गस्त करताना अवैध गौण खनिज वाहतूक तपासणी मोहिमेमध्ये मौजा-मानोरा व कारवा रस्त्याने रेतीची विना परवाना वाहतूक करीत असतांना मारोती खणके यांचे हायवा ट्रक क्र.MH-34-M-9370 यांचा मालकीचे  जप्त करण्यात आले. तसेच, स्वप्नील काशीकर यांचे हायवा ट्रक क्र. MH-34-AB-1055 जप्त करुन दोन्ही वाहन तहसील कार्यालय, बल्लारपूर येथे जमा करण्यात आले. 

सदरची कारवाई स्नेहल रहाटे परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसिलदार बल्लारपूर यांचे भरारी पथकाकडून करण्यात आली असून पथकामध्ये श्री.बिडवाई नायब तहसिलदार( परि ), श्री.कनाके तलाठी व श्री.सिध्दार्थ वनकर वाहन चालक यांचेकडून करण्यात आली आहे.



Post a Comment

0 Comments