बल्लारपूर शहरात नगर परिषदेच्या वतीने निमंत्रितांचे क्रिकेट चषक स्पर्धेचे आयोजन

 




बल्लारपूर शहरात नगर परिषदेच्या वतीने निमंत्रितांचे क्रिकेट चषक स्पर्धेचे आयोजन 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरात 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नगर परिषद बल्लारपूरच्या वतीने सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव 2023 अंतर्गत बल्लारपूर शहरात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्याचे ( निमंत्रितांचे क्रिकेट चषक स्पर्धेचे ) आयोजन करण्यात आलेले आहे. रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन बल्लारपूर शहरातील तालुका क्रीडा संकुल, गौरक्षण वॉर्ड बल्लारपूर येथे 30 जानेवारी ते 1 फरवरी 2023 दरम्यान करण्यात आले असून सदर क्रिकेट सामने सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहेत. 

या अंतर्गत पोलिस विभाग, बल्लारपूर मेडिकल असोसिएशन, पत्रकार, आजी-माजी नगरसेवक, शिक्षक, व्यापारी, नगर परिषद बल्लारपूर कर्मचारी, स्वच्छता विभाग, ट्रान्सपोर्टर, वकील अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नागरिकांच्या रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन बल्लारपूर शहरातील नागरिकांनी या निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद घ्यावा असे आवाहन मा. विशाल वाघ, मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद बल्लारपूर यांनी केले आहे.




Post a Comment

0 Comments