बल्लारपूर जेसीआय वूडसिटीच्या अध्यक्षपदी भावेश चौव्हाण नवनिर्वाचित अध्यक्षाना दिली शपथ
◾क्रीडापटुंचा उल्लेखनिय कामगिरीबद्दल सत्कार
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर येथील जेसीआय वूडसिटी क्लबच्या वतीने स्थानिक मार्केडेय सभागृहात वार्षिक कार्यक्रम पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करून शहराचा नावलौकिक वाढविल्याबद्दल क्रीडापटुंचा सत्कार करण्यात आला. दरम्यान आगामी वर्षासाठी भावेश चौव्हाण यांची नुतन अध्यक्ष म्हणून जेसीआय च्या पदावर निवड करण्यात आली. यावेळी मावळत्या अध्यक्ष विना दोतपेल्ली यांनी नवनिर्वाचित अध्यक्षाना शपथ दिली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेसीआय वूडसिटीच्या अध्यक्ष विना दोतपेल्ली होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून माऊंटफोर्ट स्कूल चे प्राचार्य एम. एम. अंटोनी, अनुप गांधी, जितेंद्र बोरा, महेंद्र जोशी,सुनील जैन,नवनिर्वाचित अध्यक्ष भावेश चौव्हाण यांची उपस्थिती होती.
दरम्यान प्रमुख अतिथिंच्या हस्ते ऑल इंडिया पावर लिफ्टिंग स्पर्धेत सवर्ण पदक विजेता अहमद इस्माईल ढाकवाला आणि निता जगतपाल वर्मा यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुछ प्रदान करून सत्कार करण्यात आला.
यावेळी सुनील जैन यांच्या मार्गदर्शनात नुतन अध्यक्ष भावेश चौव्हाण यांनी जेसीआय वूडसिटी बल्लारपूर ची विस्तारित कार्यकारिणीत उर्वशी चौव्हाण, श्रीनिवास बुग्गावार, विकास राजूरकर, गोपाल खंडेलवाल, देविदास काम्पेल्ली, गिता ओहरी, विशाल भाटिया, विनोद काबरा, गुलशन ओहरी, प्रविण पोपळी, राजू मुंधळा, आशिष चावडा यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रास्ताविकातून मावळत्या अध्यक्ष विना दोतपेल्ली यांनी गत वर्षात केलेल्या कार्याचा आढावा सादर केला. यावेळी संजय गुप्ता, रविंद्र फुलझेले, अनुप खुटेमाटे, प्रदीप भास्करवार, विनोद कोपरकर, संजय पोतद्दार, राजेंद्र शर्मा, सोमेश खंडेलवाल, राकेश वखारिया, राजेश गिडवाणी, प्रकाश दोतपेल्ली, तेजिंदर दारी, गुलशन ओहरी यांची उपस्थिती होती.






0 Comments