स्वातंत्र्य सेनानी बाबुरावजी बनकर यांच्या स्मृती सदैव प्रेरणा देतील - हंसराज अहीर
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूरातील ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी श्री बाबुरावजी बनकर यांचे वृध्दापकाळाने वयाच्या 94 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जुन्या पिढीतील लढाऊ बाण्याचा मार्गदर्शक हरपला आहे. अन्यायाविरुध्द आवाज उठविणाऱ्यांपैकी असणाऱ्या बाबुरावजींच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचे वर्तमान व भावी पिढ्यांना नेहमीच स्मरण राहील. त्यांच्या ब्रिटीश सत्तेविरुध्दच्या लढ्यातून सदैव प्रेरणा मिळत राहील अशी शोकसंवेदना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केली. बाबुरावजींच्या आत्म्यास ईश्वर शांती प्रदान करो अशी प्रार्थना करुन अहीर यांनी त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.






0 Comments