अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वरोरा तालुका शाखा अध्यक्षपदी सादिक थैम तर सचिवपदी प्रशांत बदकी
वरोरा ( राज्य रिपोर्टर ) : अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हा देशातील आठ राज्यात कार्यरत असून ग्रामीण व शहरी भागातील पत्रकार संघाशी जुळल्या जावा हा मूळ उद्देश घेऊन, पत्रकारांच्या जीवनाशी निगडित तसेच जनतेला भेडसावणाऱ्या विविध क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी सदर पत्रकार संघ सदैव तत्पर आहे. आणि चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका,जिल्हा पातळीवर कार्यकारिणी गठीत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदेश जनसंपर्क प्रमुख रवींद्र तिराणीक अख्खा महाराष्ट्र पिंजून काढतो आहे. याच अनुषंगाने वरोरा तालुका कार्यकारिणी गठीत करण्यासाठी २१ जानेवारी २०२३ ला वरोरा येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्य जनसंपर्क प्रमुख यांच्या उपस्थितीत कार्यकारिणी तयार करण्यात आली. कार्यकारिणीत वरोरा तालुका शाखा अध्यक्षपदी सादिक थैम, सचिवपदी प्रशांत बदकी ,कार्याध्यक्षपदी नरेश साळवे,उपाध्यक्षपदी मनोज गाठले,सहसचिव पदी सुशील शिरसाठ,कोषाध्यक्ष जगदीश पेंदाम,संघटक ग्यानीवंत गेडाम ,प्रसिद्धी प्रमुख तुलसी आलम ,सदस्य परमानंद तिराणीक ,गांधी बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा अभिनंदन ठराव सुद्धा पारित करण्यात आला.
बैठकीला राज्य जनसंपर्क प्रमुख रवींद्र तिराणीक,चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख शशिकांत मोकाशे,चंद्रपूर -गडचिरोली ग्रामीण संपर्कप्रमुख दशरथ वाघमारे,चंद्रपूर जिल्हा ग्रामीण संघटक सुरेश बांगडकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोहपरे यांची उपस्थिती होती.याप्रसंगी राज्य संपर्क प्रमुख रवींद्र तिराणीक यांनी पद नियुक्त्या झाल्यानंतर त्यांची जबाबदारी ,राष्ट्रीय स्तरावर पदाधिकाऱ्यांसाठी विमा संरक्षण बाबत माहिती आणि सदस्यत्व नोंदणी प्रक्रिया ,आणि पत्रकारांनी संघटनेच्या नियमाचे अनूपालन करीत आपली पत्रकारिता कशी करावी याबाबत त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱयांसमोर आपले मार्गदर्शनातून मौलिक विचार व्यक्त केले.




.jpeg)


0 Comments