नाभिक जनकल्याण संघ चंद्रपूर तर्फे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

 





नाभिक जनकल्याण संघ चंद्रपूर तर्फे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : नाभिक जनकल्याण संघ चंद्रपूरचे महिला समिती द्वारा रविवार दिनांक 22 जानेवारी 2023 ला मकर संक्रांतीचे औचित्य साधून हळदी कुंकू चा कार्यक्रम संत नगाजी  महाराज सभागृह,समाधी वार्ड चंद्रपूर,येथे घेण्यात आला. 

 मंचावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. मोहन वनकर अध्यक्ष नाभिक जनकल्याण संघ चंद्रपूर.  यांची उपस्थिती होती.  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. अंजलीताई पंदीलवार,प्रमुख अतिथी मयूर वनकर सचिव नाभिक जनकल्याण संघ चंद्रपूर व या कार्यक्रमाचे आयोजन समितीच्या प्रमुख सौ. ज्योतीताई आकणपल्लिवार यांची उपस्थिती होती. सौ.अंजलीताई पंदीलवार यांनी आपले संबोधनात समाजा च्या विकासासाठी संपूर्ण समाजाने एकजूट होण्याची आवश्यकता असल्याचे कथन केले. श्री. मयूर वनकर यांनी आपल्या संबोधनातून मोलाचे मार्गदर्शन केले. श्री. मोहन वनकर यांनी आपले अध्यक्षीय भाषणातून समाजाच्या उत्थानासाठी यापुढे विविध शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रम तथा योजना कशा राबविता येईल त्यासाठी समाजातील बांधवांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सौ. ज्योतीताई आकनपल्लीवार यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणातून या कार्यक्रमाची संकल्पना महत्त्व व त्याबद्दलची रूपरेषा यावर आपले विचार मांडले.

हळदी कुंकू कार्यक्रमासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले त्यात गायन,नृत्य इत्यादी स्पर्धा घेण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहासिनी आकनपल्लीवार व आभार प्रदर्शन सौ. योगिता वनकर यांनी केले.

 या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता कार्यक्रम नियोजन समितीचे सौ. हेमलता अनिल वनकर, सौ. प्रणिता आकनपल्लीवार ,मनीषा महागावकर, साधना सूत्रपवार, मंगला रुद्रपवार आणि रीना रुद्रपवार नाभिक जनकल्याण संघाचे उपाध्यक्ष अमोल वैद्य, सचिव सचिन पंदीलवार, सहसचिव अशोक येडेवार, कोषाध्यक्ष संदेश चल्लीरवार, संघाचे संघटक श्री. दत्तात्रय पंदीलवार, श्री. प्रकाश आकनपल्लीवार, विकास वनकर सल्लागार श्री. अनिल वनकर, धीरज सूत्रपवार, विजय रुद्रपवार,  राजू महागमकर, विजय महागणकार यांनी अथक परिश्रम केले.




Post a Comment

0 Comments