स्पष्ट वक्ते, अभ्यासु , सामाजिक व राजकारण्यांना मार्गदर्शक नेतृत्व हरपले - हंसराज अहीर
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : शेतकरी, कष्टकरी व बहुजनांच्या न्याय हक्कासाठी झटणारे, स्वाभिमानी, स्पष्टवक्ते, अभ्यासु तसेच राजकारणातील अजातशत्रु. जिल्ह्यातील सामाजिक व राजकिय क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचे मार्गदर्शक नेतृत्व म्हणून ऍड. मोरेश्वरराव टेमुर्डे यांची ख्याती होती. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधीही भरुन न निघणारी आहे. पक्षीय मतभेदांच्या पलीकडे जावून सौजन्यशिल व करारीपणे राजकारण करणारे राजकारणी म्हणून त्यांच्याकडे बघीतले जाते. महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्ष पदाची त्यांची कारकिर्द नेहमीच स्मरणात राहील अशा लोकाभिमुख नेतृत्वाचे जाणे क्लेशदायी असून इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो अशा शोक संवेदना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केल्या आहेत.







0 Comments