न.प.बल्लारपूर द्वारा संचालित प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये 61 वे आंतरशालेय क्रीडा सम्मेलन व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : नगर परिषद बल्लारपूर द्वारा संचालित प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये 61 वे आंतरशालेय क्रीडा सम्मेलन व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन दिनांक 23 जानेवारी 2023 ते 29 जानेवारी 2023 या कालावधीत विजयालक्ष्मी पंडित प्राथमिक शाळा नगर परिषद बल्लारपूर कन्नमवार वार्ड येथे मा. विशाल वाघ प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन 23 जानेवारीला व सांस्कृतिक कार्यक्रम प्राथमिक चे 27 जानेवारीला तसेच माध्यमिक शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक 28 जानेवारीला व बक्षीस वितरण समारंभ 29 जानेवारीला न. प. नाट्यगृहात होत आहे. या महोत्सवात मैदानी खेळ मुलांचे व मुलींचे यामध्ये कबड्डी ,खो- खो, रस्सीखेच लंगडी व रिले रेस तसेच वैयक्तिक खेळात 100 मीटर 200 मीटर दौड दोरीवर उङया तीन पायांची दौड संगीत खुर्ची व सांस्कृतिक कार्यक्रमात समुह नृत्य एकल नृत्य फॅन्सी ड्रेस व बौद्धिक स्पर्धेत वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून या स्पर्धेत एकूण 13 प्राथमिक व 1माध्यमिक शाळांचे 1212 विद्यार्थी-विद्यार्थिनी, 32 उत्कृष्ट शिक्षकांच्या व एजन्सी द्वारा नियुक्त 17 शिक्षकांच्या निरीक्षण व देखरेखीखाली आपले क्रीडा कौशल्य, नृत्यकला व बौद्धिक कौशल्याची चुणूक 14 शाळांचे विद्यार्थी र्विद्यार्थिनी एका मंचावर येवून दाखविण्याबरोबर खेळाडूवृत्ती, खेळ भावना, संघ भावनेचा परिचय पण देणार आहे.तरी सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून न. प. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा.






0 Comments