बल्लारपुरात रेल्वे चौक परिसरात भीषण अपघात 1 व्यक्तीचा घटना स्थळीच मृत्यू

 




बल्लारपुरात रेल्वे चौक परिसरात भीषण अपघात 1 व्यक्तीचा घटना स्थळीच मृत्यू


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहर औद्योगिक दृष्ट्या महत्वाचे शहर म्हणुन ओळखले जाते त्यामूळे राज्यमहामार्गावर सतत वर्दळ असते अनेक लहान सहान अपघात यापूर्वी घडले आहे मात्र आज दुपारी  1:00 च्या सुमारास बल्लारपूर शहरातील रेल्वे चौक परिसरात एका 16 चाकी ट्रकने एका पादचारी व्यक्तीस नामे मोहम्मद फारूख अब्दुल गफ्फार वय - 70 वर्षे, रा. संत कबीर वॉर्ड हिंगणघाट येथील रहिवासी असून काही कामासाठी बल्लारपुरात आले असतांना रस्ता पार करतांना चंद्रपूर वरुन आलापल्ली जाणाऱ्या ट्रक क्र. MH 34 AJ 3596 ने चिरडले असून त्या व्यक्तीचा घटना स्थळीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला. या अपघाताची माहीती पोलिसांना कळताच उमेश पाटील, पोलिस निरीक्षक बल्लारपूर, विकास गायकवाड सपोनि बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली परिस्थितीवर नियंत्रण मिळविले व संबंधित व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदन  साठी ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे पाठविण्यात आला असून पुढील तपास बल्लारपूर पोलिस करत आहे.



Post a Comment

0 Comments