चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यात गॅस एजंसी वृध्दीसाठी हंसराज अहीर यांची केंद्रीयमंत्री हरदीप सिंह पुरी यांचेशी चर्चा former Union Minister of State for Home Hansraj Ahir, Union Petroleum and Gas Minister Hardeep Singh Puri
चंद्रपूर/यवतमाळ( राज्य रिपोर्टर ) : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रीय पेट्रोलियम आणि गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी जी यांची दि. 21 डिसें. रोजी नवी दिल्ली येथे भेट घेतली. Chairman of National Commission for Backward Classes Hansraj Ahir
या भेटीप्रसंगी अहीर यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात घरगुती गॅस सिलेंडरचा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असल्याच्या बाबींकडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधतांनाच प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांची गॅस सिलेंडरबाबत होत असलेली परवड निदर्शनास आणली.
चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील गॅस ग्राहकांना तसेच उज्वला व अन्य योजनेतील ग्राहकांना सुलभरित्या गॅस सिलेंडर उपलब्ध व्हावेत यासाठी अधिक लोकसंख्या असलेली नजिकची शहरे किंवा बाजारपेठेच्या गावात गॅस एजन्सीचा विस्तार करण्यात यावा या मागणीसह अन्य विषयांवर सुध्दा यावेळी सकारात्मक चर्चा झाली.
अहीर यांनी केलेल्या या सुचनेची गांभीर्याने दखल घेत केंद्रीय मंत्र्यांनी यासंदर्भात लवकरच निर्णय घेवून गॅस ग्राहकांची अडचण दूर करण्याचा सकारात्मक प्रयत्न करु असे या चर्चेप्रसंगी सांगितले.







0 Comments