निश्चित ध्येय बाळगून युवक-युवतींनी कबड्डी खेळात प्राविण्य प्राप्त करावे - हंसराज अहीर Chairman of National OBC Commission and former Union Minister of State for Home Hansraj Ahir

 



निश्चित ध्येय बाळगून युवक-युवतींनी कबड्डी खेळात प्राविण्य प्राप्त करावे - हंसराज अहीर Chairman of National OBC Commission and former Union Minister of State for Home Hansraj Ahir

◾माजी खासदार चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत

◾विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ भद्रावती तर विठ्ठल व्यायाम शाळा चंद्रपूर विजेता संघ  



  चंद्रपूर( राज्य रिपोर्टर ) :  कबड्डी हा मैदानी खेळ असून हा खेळ शालेय जीवनापासून प्रत्येकाला खेळावा लागल्याने या खेळाचे महत्व महाराष्ट्रात अनन्य साधारण आहे. आरोग्याची जपणूक करणारा खेळ म्हणूनही आपण कबड्डीकडे बघतो. ग्रामीण युवक-युवतींना क्रीडा कौशल्याला संधी मिळावी व  उत्तम कबड्डीपटू उदयास यावे हा या माजी खासदार चषक जिल्हास्तरीय कबड्डी निवड चाचणी  सामन्यांचा उद्देश आहे. या  स्पर्धांमध्ये विजयी चमूंची वाटचाल विभागीय व राज्यस्तरापर्यंत व्हावी अशा शुभेच्छा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी उद्घाटन समारोह प्रसंगी दिल्या.

हौसी जिल्हा कबड्डी असोशिएशन चंद्रपूर संलग्नीत विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ भद्रावती व कमल स्पोर्टींग क्लब चंद्रपूर च्या संयुक्त विद्यमाने भद्रावती येथील यशवंतराव शिंदे महाविद्यालयाचे पटांगणात पार पडलेल्या 10 ते 12 डिसेंबर पर्यंत आयोजित पुरुष व महिला कबड्डी सामन्यास महाराष्ट्र विधानसभेचे        उपाध्यक्ष अॅड मोरेश्वर टेमुर्डे, चंजिमस बॅंकेचे संचालक रविंद्र शिंदे, भाजपा नेते विजय राऊत, डॉ विवेक शिंदे, खुशाल बोंडे, अहेतेशाम अली, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, करण देवतळे, चंद्रकांत गुंडावार, डॉ प्रविण केशवाणी अशोक हजारे, विजय वानखेडे, सुनिल नामोजवार, अफजलभाई, ज्ञानेश्वर डुकरे, दिलीप रामेडवार, प्रा. जयंत वानेखेडे, प्रा.धनराज आस्वले, प्रविण सातपूते, प्रशांत डाखरे, किशोर गोवारदिपे, राष्ट्रीय खेळाडू अनिल माळवे, आकाश वानखेडे आदि मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये  पुरुष  ‘‘अ’’ गटात 38 व ‘‘ब’’ गटात 40 संघ तर महिला ‘‘अ’’ गटात 8 व ‘‘ब’’ गटात 10 संघांनी भाग घेतला. यात पुरुष अ गटात विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ, भद्रावती हा विजेता संघ म्हणून तर साईबाबा बहुउद्देशिय क्रीडा मंडळ चंद्रपूर उपविजेता म्हणून घोषीत करण्यात आला. महिला अ गटात विठ्ठल व्यायाम शाळा चंद्रपूर विजेता तर ब गटात जय हिंद नागरी क्रीडा मंडळ उपविजेता ठरली. पुरुष ब गटात  विठ्ठल व्यायाम शाळा चंद्रपूर विजेता तर उपविजेता संघ टागोर क्रीडा मंडळ चंद्रपूर ठरला. ब गट महीला विजेता संघ जय हिंद नागरी तर उपविजेता सरस्वती विद्यालय सिंदेवाही ठरला.

विजयी स्पर्धकाना हंसराज अहीर व प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते शिल्ड व रोख रक्कम देवून सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वीतेकरीता विद्यार्थी व क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष सचीन वावरदडपे, सविव सचीन बोरकर, सदस्य विजय भानारकर, अजिज शेख, संदीप कल्लो, अनिल पढाल, राहूल राजुरकर, त्रिशुल पढाल, अमोल ठावरी, रणधीर चौधरी, अमोल रोडे, अजय काकडे, योगेश मोडक, आकाश राऊत आदिंनी विशेष परिश्रम घेतले.



Post a Comment

0 Comments