पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने जिल्‍हा स्‍टेडियम येथे जलतरण तलावासाठी १ कोटी ५७ लक्ष १५ हजार रू. निधी मंजूर

 






पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने जिल्‍हा स्‍टेडियम येथे जलतरण तलावासाठी १ कोटी ५७ लक्ष १५ हजार रू. निधी मंजूर

◾माजी उपमहापौर राहूल पावडे यांनी मानले पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार.

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : वने, सांस्‍कृतीक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर जिल्‍हा क्रिडा संकुल येथील जलतरण तलावाचे फिल्‍टरेशन प्‍लॅन्‍ट व विद्युतीकरण करणे या कामासाठी १ कोटी ५७ लक्ष १५ हजार रू. निधी मंजूर करण्‍यात आला आहे. सर्वसाधारण जिल्‍हा वार्षीक योजना सन २०२२-२३ अंतर्गत या कामाला दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजीच्‍या पत्रान्‍वये जिल्‍हाधिकारी चंद्रपूर यांनी प्रशासकीय मान्‍यता प्रदान केली आहे.

चंद्रपूर जिल्‍हा क्रिडा संकुल येथील जलतरण तलावाबाबत नागरिकांच्‍या अनेक तक्रारी होत्‍या. यासंदर्भात चंद्रपूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राहूल पावडे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देत निधी मंजूरीसाठी सातत्‍याने पाठपुरावा केला. त्‍यांच्‍या पाठपुराव्‍याला यश प्राप्‍त झाले असून सुधीर मुनगंटीवारांच्‍या पुढाकाराने जलतरण तलावाचे फिल्‍टरेशन प्‍लॅन्‍ट व विद्युतीकरणाच्‍या कामासाठी १ कोटी ५७ लक्ष १५ हजार रू. मंजूर करण्‍यात आला आहे.

यामुळे चंद्रपूर महानगरातील जलतरण पटूंची समस्‍या कायमची दूर होणार असून त्‍यांच्‍यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेचे माजी महापौर राहूल पावडे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन व आभार व्‍यक्‍त केले आहे.



Post a Comment

0 Comments