राजुरा माजी आमदार स्व. प्रभाकरराव मामूलकर यांच्या जयंती निमित्त आयोजित शेतकरी मेळावा, सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे विधिवत उदघाटन हंसराज अहीर यांचे शुभहस्ते





राजुरा माजी आमदार  स्व. प्रभाकरराव मामूलकर यांच्या जयंती निमित्त आयोजित शेतकरी मेळावा, सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे विधिवत उदघाटन हंसराज अहीर यांचे शुभहस्ते


राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच लोकनेते, माजी आमदार  स्व. प्रभाकरराव मामूलकर यांच्या जयंती निमित्त राजुरा येथील शिवाजी महाविद्यालयात दि. १९ डिसेंबर रोजी  आयोजित शेतकरी मेळावा, सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे विधिवत उदघाटन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग भारत सरकारचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. हंसराज अहीर यांचे शुभहस्ते पार पडले. यावेळी अहीर यांनी आपल्या संबोधनात लोकसेवक मामूलकर जी यांच्या सामाजिक व राजकीय कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.  या कार्यक्रमास माजी खासदार नरेशबाबू पुगलिया, माजी आमदार ऍड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, सुधाकर कुंदोजवार, श्रीमती. सुमनताई मामूलकर, खुशाल बोन्डे, राजू घरोटे, दत्तात्रयजी वेंगीनवार , श्रीधरराव गोडे, ऍड अरुण धोटे, अरुण निमजे, पांडुरंग जाधव, गजानन जुमनाके, गजाननराव गावंडे, आबिद अली, आबाजी ढुमणे, अविनाश जाधव आदि  मान्यवर  उपस्थित होते.

           याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार नरेशबाबू पुगलिया जी यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल श्री. हंसराज अहीर यांचे हृदय स्वागत केले.



Post a Comment

0 Comments