बल्लारपुर पोलिस स्टेशन 100 मीटर अंतरावर दोन दुकानात धाडसी चोरी
◾जवळपास 1 लाख 20 हजार रू ची चोरी झाल्याची सूत्रांची माहीती
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरातील राज्यमहार्गावरील व सतत वर्दळ असणाऱ्या मार्गावर तसेच घटनास्थळापासून तहसील कार्यालय, नगर परिषद, ग्रामीण रुग्णालय, पोलिस स्टेशन अशी अनेक शासकीय कार्यालय 100 मीटर अंतरावर असतांना अतिव्यस्त ठिकाणी चोरटयांनी डाव साधून धाडसी चोरी केल्याची धक्कादायक घटना बल्लारपूर शहरात घडली आहे.
या संदर्भातील अधिक माहितीनुसार बल्लारपूर शहरातील तहसील कार्यालय समोर व ग्रामीण रुग्णालय लगत असलेल्या महाराष्ट्र फूट वेअर या दुकानातुन मोनिटर, CC कॅमेरा,बुट व नगदी रूपए व नवनीत फोटो स्टुडिओ दुकानातुन कॉमेरा,लेंन्स व फोटो स्टुडिओ सम्बंधित साहित्य या दोन दुकानात चोरी झाली असल्याची घटना घडली विशेष बाब म्हणजे या आस्थापना मध्ये सीसीटीव्ही लागले असून चोरटयांनी सीसीटीव्ही फोडून वा बंद करून चोरी केली आहे महाराष्ट्र फूट वेअर व नवनीत फोटो स्टुडिओ अशा दोन्ही दुकानातून जवळपास 1,20, 000/- रू चा मुद्देमाल चोरी झाल्याची माहीती सूत्रांकडून प्राप्त होत आहे विशेष बाब म्हणजे या दुकानाजवळ अनेक शासकीय कार्यालय असून या कार्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे या घटनेची माहीती बल्लारपूर पोलिसांना कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास बल्लारपूर पोलिस करीत आहे.






0 Comments