राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकारी श्रीमती. लीना कुसराम यांनी कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश
◾मा.चंदनभैय्या चंदेल माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश घेतला
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरात माजी अर्थ नियोजन व वन मंत्री आ. मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी श्रीमती.लीनाताई कुसराम यांनी कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात माननीय,चंदनभैय्या चंदेल, माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश घेतला.याप्रसंगी संगठन प्रभारी श्रीमान रामजी लाखियां,भाजपाचे शहराध्यक्ष काशीनाथ सिंह, महामंत्री मनीषजी पांडे हे उपस्थित होते.
श्रीमती. लीनाताई कुसराम यांच्यासह श्रीमती.सुमनबाई मेश्राम, श्रीमती. वंदनाताई मडावी,श्री.अविनाशजी तुमराम,श्री.संदेश जी कोडापे, ओम मडावी यांनी देखील प्रवेश घेतला. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मा.चंदनभैया यांनी सांगितले की मा.सुधीरभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश घेतलेल्या सर्वांचे आभार मानतो व त्यांचे पक्षात स्वागत करतो.
भारतीय जनता पार्टीची विचारसरणी ही शेवटच्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास करण्यास्तव नेहमी मार्गस्थ असल्या कारणांनी भारतीय जनता पार्टी कडे जनतेचा कल नेहमीच वाढत असतो त्याचाच हा एक भाग असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी जिला अध्यक्ष श्री. धनराज कोवे, श्री. हरीश गेडाम महामंत्री, अरविंद मडावी, गंगाधर कुटावार, श्री.दिलीप पेंदोर,श्री.अविनाश तुमराम,श्रीमती.तानाबाई मेश्राम, श्री.भास्कर पेंदोर,श्रीमती.उमा नेताम,श्री.दिगांबर नैताम,श्रीमती.उषाताई आत्राम, श्रीमती.पूजाताई कुळमेथे, श्रीमती.कविताताई भांडेकर,श्रीमती.अरुणाताई तोडसाम,श्रीमती.निर्मलाताई कुमरे,श्री.मनोज सुरपाम,श्री.ओम मेश्राम,श्री.सुनील सिडाम,श्री.कुणाल मेश्राम इत्यादी उपस्थित होते.







0 Comments