बल्लारपूर तालुका विसापुरातील युवक ठरला उष्माघाताचा बळी
◾चंद्रपूर जिल्ह्यात दररोज उष्णतेचे उच्चांक मोडले जात आहे.
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्ह्यात दररोज उष्णतेचे उच्चांक मोडले जात आहे. पारा ४७ डिग्री कधीचाच पार झाला आहे. त्यामुळे उष्णतेने होरपळून बळी पडणाऱ्यानंची संख्या दिवसा दिवस वाढतच आहे. असाच बल्लारपूर तालुका विसापूर येथील विजय महादेव टेकाम ( ३२ ) हा युवक ड्युटी वरून घरी परत आला तेंव्हा त्याला वातावरणातील उकळ्यामुळे अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबीयांनी त्याला चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात भरती केले परंतु उपचारादरम्यान मंगळवार सकाळी त्याचा मृत्यू झाला.
विजय हा चंद्रपूर फेरो अलॉट प्लांट ( एम इ एल ) येथे ऑपरेटर पदावर कार्यरत होता रविवराला तो दोन दहा ड्युटी करून घरी परतला असता त्याला अस्वस्थ वाटू लागले होते त्याने मोठ्या भावाला आपल्या तब्येतीबद्दल सांगितले तेव्हा त्याला सकाळी सोमवारला चंद्रपूरला वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले होते. तो दररोज भर उन्हात दुपारला विसापूर येथून चंद्रपूरला ड्युटी वर जात होता ड्युटी दरम्यान सद्याचे उष्ण वातावरण मुळे तो कमालीचा वैतागला होता परंतु तो घरच्या जबाबदारीने दररोज ड्युटी करत होता. भर उन्हात ड्युटीवर जात असल्यामुळेच त्याला उष्माघात झाला असावा त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असावा अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
परंतु मृत्यू कशामुळे झाला ही माहिती डॉक्टरच्या रिपोर्ट नंतरच कळणार वृत्त लिहीपर्यंत त्याच्या पार्थिवावर विसापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सायंकाळी ४-०० वा.अंत्यसंस्कार करण्यात आले होते.तो माजी ग्रामपंचायत सदस्य सन्नी टेकाम यांचा थोरला भाऊ होता. त्याच्या पश्चात आई वडील, दोन भाऊ वहिनी पुतणे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.
0 Comments