WCL बल्लारपूर वेकोलीच्या रेल्वे सायडिंग रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू
◾बल्लारपूर काॅलरी 3&4 फीट रेल्वे सायडिंग परिसरातील घटना
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : WCL वेकोलीच्या बल्लारपूर रेल्वे सायडिंग परिसरातील एक धक्कादायक व दुर्दैवी घटना घडल्याची माहिती असून आज दुपारी १:३० वाजताच्या दरम्यान वेकोलीच्या बल्लारपूर काॅलरी 3&4 फीट रेल्वे सायडिंग कडून येणाऱ्या रेल्वे ने धडक दिल्याने एका युवकाचा मृत्यू झाला आहे सूत्राच्या माहितीनुसार सदर युवकाचे नाव दिलीप बल्ला वर्मा वय (27) वर्ष असून तो बल्लारपूर शहरातील डॉ.आंबेडकर वार्ड येथील निवासी आहे. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली असून या संदर्भातील पुढील तपास सुरू आहे मात्र या दुःखद घटनेमुळे या परिसरात शोकमग्न वातावरण पसरले आहे.










0 Comments