50 हजाराची लाच घेताना पोलिसांना रंगेहात पकडले
◼️राजुरा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील दोन पोलीस सापडले जाळ्यात
राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : उपविभागीय पोलिस अधिकारी राजुरा कार्यालयातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने 50 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली असुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतलेल्या झडतीमधे वाहनातून 2,60,000 रुपयांची रोकड सुद्धा हस्तगत करण्यात आल्याची चर्चा आहे.
राजुरा उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या सुरक्षा रक्षक व रायटरला ताब्यात घेतल्याची चर्चा असुन सदर यशस्वी कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपुर येथील चमूने उपविभागीय अधिकारी चाफले ह्यांच्या नेतृत्वात सापळा रचून रंगेहाथ अटक केली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले असुन वृत्त्त लिहीत पर्यंत विभागाची कारवाई सुरू असल्यामुळे इतर माहिती प्राप्त होऊ शकली नाही.
0 Comments