बल्लारपूर येथील छट घाट ( वर्धा नदीत ) बालकांचा बुडून मृत्यू
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर येथील वेकोली परिसरात छट घाटावर आज सायंकाळी ६:00 वाजताच्या दरम्यान अयान फिरोज खान वय (१३) वर्ष रा.भगतसिंग वार्ड, बल्लारपूर बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे याविषयीच्या अधिक माहितीनुसार बल्लारपूर शहरातील घुग्गुस फाईल ( भगतसिंग वार्ड, बल्लारपूर ) परिसरातील सदर बालक असून तो आपल्या मित्रासोबत नदीवर आंघोळीला छटपूजा घाटावर गेला असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला या घटनेची माहिती परिसरातील नागरीकांना कळताच त्यांनी लगेच पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळ गाठून सदर बालकाला ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यानी सदर बालकाला मृत घोषित केले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे पाठविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.
0 Comments