गोंडवाना विद्यापीठाला फॉरेस्ट व ट्रायबल दर्जा देणार - आ. सुधीर मुनगंटीवार

 



गोंडवाना विद्यापीठाला फॉरेस्ट व ट्रायबल दर्जा देणार - आ. सुधीर मुनगंटीवार

◾आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या आग्रहानंतर उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई ( राज्य रिपोर्टर ) : विधानसभेत विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आग्रही भूमिका घेतल्यानंतर राज्य  सरकारने  गोंडवाना विद्यापीठाला ‘फॉरेस्ट व ट्रायबल’ दर्जा देण्याची तयारी शुक्रवारी (ता. २५) दर्शविली.

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विनीयोजन विधेयकावर बोलताना गुरुवारी (ता. २४) यासंदर्भात अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत लक्ष वेधले होते. २०११ मध्ये गडचिरोली व चंद्रपूर या मागास व आदिवासी बहुल भागांसाठी गोंडवाना विद्यापीठाची स्थापन करण्यात आली होती. आदिवासीबहुल भाग असल्याने गोंडवाना विद्यापीठाला विशेष दर्जा देण्यात यावा, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. विशेष दर्जा प्राप्त झाल्यास गोंडवाना विद्यापीठाला केंद्र सरकारही निधी देऊ शकते, असे त्यांनी नमूद केले होते.

गोंडवाना विद्यापीठाबाबत आ. मुनगंटीवार यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सोमवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या विद्यापीठाला ‘फॉरेस्ट व ट्रायबल’ दर्जा देण्यात येईल, असे जाहीर केले. पुढील अधिवेशनापर्यंत याबाबतची सर्व पूर्तता करण्यात येईल, अशी ग्वाही सामंत यांनी दिली.

Post a Comment

0 Comments