एटीएम फोडण्याचा प्रयत्न : पोलिसांच्या संतर्कतेने आरोपीस रंगेहात अटक !

  



एटीएम फोडण्याचा प्रयत्न : पोलिसांच्या संतर्कतेने आरोपीस रंगेहात अटक !

नागपूर ( राज्य रिपोर्टर ) : आजच्या काळात कोण कधी काय करेल याचा काही नेम नाही तसेच सद्यस्थितीत गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होत आहे अंग मेहनतीने काम करण्यापेक्षा अल्पावधीत अट्टल व धाडसी चोऱ्या करून पैसे प्राप्त करण्याच्या घटनेत वाढ होत चालली आहे. बुटीबोरी औद्योगिक परिसरातील इंडोरामा कंपनी गेट क्र. १ समोरील एचडीएफसी बँकेचे एटीएम लोखंडी सबलीने फोडण्याचा प्रयत्न करीत असलेल्या अठ्ठल चोरट्यास एमआयडीसी पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले. ही घटना मध्यरात्री २.३० ते ३ वाजताच्या दरम्यान घडली. रानू राजू मडकामे (२५), टा. वॉर्ड क्र. ५, गडचिरोली, ह.मु. डोंगरगाव, जि. नागपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार आरोपी टानू मडकामे याने तीन वर्षापूर्वी स्वतःच्या लग्नासाठी एका मित्राकडून १ लाख रुपये उसने घेतले होते. तीन वर्षे लोटूनही त्याने पैसे परत न केल्याने आता मित्र पैशासाठी सतत तगादा लावत होते. तेव्हा एवढी मोठी रक्कम कुठून आणायची या विचारात तो होता. दरम्यान त्याला एटीएम फोडून चोरी करण्याची कल्पना सुचली. यासाठी त्याने यूट्यूब मध्ये एटीएम कसे फोडायचे याचे विविध व्हिडीओसुद्धा बघितले होते. काल रात्री त्याने आपली योजना फत्तेह करायचे ठरविले. त्याने बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र गाठले व इंडोरामा कंपनीच्या गेटसामोरील एचडीएफसी बँकेच्या एटीएमवर कुणीही सुरक्षारक्षक किंवा जवळपास कोणीही नसल्याची संधी साधून एटीएम फोडण्यासाठी लोखंडी सब्बल घेऊन आत गेला. त्याने खोलीचे शटर खाली पाडून एटीएम फोडण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान कुणीतरी एमआयडीसी पोलिसांना सूचना दिली. माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस नायक प्रफुल राठोड हे आपले सहकारी स्वप्नील ठाकरे, अशोक सिडाम व पोलिस वाहन चालक मिश्रा यांना सोबत घेऊन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व आरोपी रानूला एटीएम फोडताना रंगेहात ताब्यात घेतले. त्याच्या जवळील लोखंडी सब्बल, एमएच 40/ सी. एफ.- 8350 क्रमांकाची दुचाकी असा एकूण ३०५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार शैलेंद्र नागरे करीत आहे.

Post a Comment

0 Comments