दुःखद घटना : बल्लारपूर येथील किल्ला वार्ड निवासी गुंटूर रेल्वे स्टेशन जवळ अपघातात मृत्यू
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर येथील किल्ला वार्ड निवासी धनराज देवराव पिंपळकर, ( ४५ ) वर्ष, हे काल दुपारी ३:०० वाजताच्या सुमारास रेल्वेने दक्षिण भारतात देवदर्शनासाठी जात असतांना रात्री १:०० वाजताच्या सुमारास आंध्रप्रदेशातील गुंटूर रेल्वे स्टेशन जवळ तुन तोल जाऊन पडल्यामुळे दुःखद मृत्यू झाला आहे.
या संदर्भातील अधिक माहितीनुसार धनराज व त्याचे सोबती काल बल्लारपूर रेल्वे स्थानकावरून दुपारी ३:०० वाजता दक्षिण भारतात देवदर्शनासाठी गेले असता रात्री १:०० वाजताच्या सुमारास बाथरूमला जायच आहे असे सांगून गेले असता सदर घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे.
धावत्या रेल्वे तुन कुणीतरी पडल्याची माहिती प्रवाशाला कळली असता त्याने इतर प्रवाशांना माहिती दिली असता रेल्वे थांबवून चौकशी केली असता या रेल्वे अपघातात धनराज यांचा मृत्यू झाल्याची माहीती आहे. सदर घटनेचे वृत्त आज बल्लारपूरातील किल्ला वार्ड परिसरात माहीत झाले असता शोककळा पसरली या घटनेतील मृतक धनराज पिंपळकर यांच्या पश्चात पत्नी व २ मुली आहेत.
0 Comments