अपघाताला 24 ही तास उलटले नसताना बल्लारपूरात दुसरी घटना, अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी
◾बल्लारपूरात दिलीप टॉकीज समोर कोतपल्लीवार पेट्रोल पंप, परिसरात सुबाभुळ घेऊन येणारा ट्रक उभ्या दुचाकीला धडक देऊन पलटला
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर कलामंदिर, न्यू-कॉलोनी च्या बांबू डेपोतुन बांबू भरलेला ट्रक क्रमांक MH 34 AB 4071 काल सकाळी ८:०० वाजताच्या सुमारास राम मंदिरच्या उतारावरून येताना ब्रेक निकामी झाल्यामुळे राज्य महामार्गावर अपघात होऊन ट्रक पलटी झाला.
या अपघाताला २४ ही तास उलटले नसताना अंदाजे रात्री ११:३० वाजताच्या सुमारास दिलीप टॉकीज समोर कोतपल्लीवार पेट्रोल पंप, परिसरात सुबाभुळने भरलेला ट्रक हा रस्त्यावर उभी असलेल्या दुचाकीला धडक देऊन पलटी झाल्याची घटना घडली ट्रक क्रमांक AP 39 V 1659 क्रमांकाचा ट्रक आंध्रप्रदेशातून सुबाभुळ घेऊन येत असतांना बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरील दिलीप टॉकीज समोरील पेट्रोल पंप लगत उलटला सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही.
मात्र या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. चालकाचा नाव अनुमंतू राव ( 65 ) रा. नंदिग्राम, जि.क्रिष्णा आंध्रप्रदेश आहे. मात्र या अपघातात मुळे काँगेस नेते नासिर खान यांच्या घरासमोर घटना घडल्यामुळे त्यांचा मार्ग अवरुद्ध झाला आहे. तसेच या अपघातामुळे काही दुकांदारांचे किरकोळ नुकसान झाले आहे. सदर घटना ओव्हरटेक च्या नादात घडली असून अनेक वाहन चालक शहरी भागातही आपले वाहन सुसाट वेगाने चालविताना दिसून येतात भविष्यात अशा घटनांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अवजड वाहनांच्या वेगावर वेळीच नियंत्रण आणणे गरजेचे आहे या अपघातामुळे चौपदरी मार्ग असलेला रस्ताचा एक पदर बेरिकेट लावून बंद करण्यात आला असून एक पदराने वाहतूक सुरू आहे या अपघाताचे माहिती कळताच बल्लारपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून या घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.












0 Comments