पालकांचे संस्कार व जिल्हावासियांचे दु:ख स्वस्थ बसू देईना....!

 

पालकांचे संस्कार व जिल्हावासियांचे दु:ख स्वस्थ बसू देईना....!

कोरोना रुग्णांसाठी दुबईस्थित  जोएल ने  चुपचाप केले अडिच लाखाचे दान.

            दखल

      प्रा.महेश पानसे.

विदर्भ अध्यक्ष, राज्य पत्रकार संघ

चंद्रपूर(राज्य रिपोर्टर) : माझा देश,माझा महाराष्ट्र, माझा चंद़पूर जिल्हा कोरोना संकटाने हादरला,दररोज कानावर जिल्हावासियांचे दु:ख कानी पडून होणाऱ्या अतीव वेदना,आईवडिलांनी दिलेले संस्कार स्वस्थ बसू देईनात.नाव नको,गाजावाजा सुद्धा नको होता.

शेवटी भद्रावती येथील रहिवासी व आता दुबई येथील रहिवासी असलेल्या जोएल ने डाँक्टर मामांना फोनवरून कोरोना रूग्णांसाठी काहीतरी मदत करण्याची इच्छा सांगितली. मामांनी सल्ला दिला आपण रूग्णांना वैदयकीय साहित्यातून हातभार लावायचे.दानी जाेएल देवधर ची एकच अट की गाजावाजा नकाे. पंधरवाडयाआधीच जाेएल देवधर यांनी चंदपूरातील ,रामनगर येथिल शासकीय काेविड रूग्णालयास अडिच लाखाचे दान केले आहे.शाेएल देवधरे यांचे मामा डॉ. बंडू रामटेके जे या रूळणालयाचे नोडयुल आँफीसर आहेत,त्यांनी कुठलाही गाजावाजा न करता अगदी निकडीच्या वेळी व्हेंटिलेटरला आवश्यक सहाय्यकारी साहित्य,आँक्सीजन देण्यासाठी आवश्यक मास्क,अतिदक्षता विभागात लागणारे अत्यावश्यक, महत्वाचे औषधोपचार यावर विनियोग करून जोऐल चे दान फळास आणले.अगदीं निकडीच्या समयी गरीब रूग्णांना यातून काहीअंशी का हाेईना मदत झाल्याचे समाधान जाेऐल देवधरे याऩा नक्कीच लाभले असणार.

               डाँ. बंडू रामटेके हे आमचे जवळचे मित्र.शाशकीय कोविड रुग्णांलयाचे सेवाभावी प़मुख आहेत त्यांनी जोएल चे इच्छेनुरूप वाच्यता न करण्याची अट ठेवूनच आमचेजवळ विषय छेडला.मात्र दुबईस्थित चंद़पूर जिल्हयातील जाेएल देवधरेचे जिहयाप़ती असलेले पृेम,जाणीव,भावनां यासमाेर डाँ. रामटेके यांनी ठेवलेली अट ताेटकी ठरली व सहजपणे कौतुकाचे चार शब्द समोर आलेत.

              जोऐल देवधर हे दुबई येथे आय.टी.अभियंता म्हणून गत तिन वषाँपासून काम करीत आहेत.पत्नी वैशालीसह  सध्या तिथेच रहिवासास आहेत. चंद्रपूर जिल्हयातील भद्रावती येथील सेवानिवृत्त शिक्षक दिलीप देवधरे व शाेभा देवधरे यांचे संस्कारातून जोऐल यांची परोपकारी घडण झालेली. परिसराशी नाळ जुळलेली.दुबईस्थित असूनही आपल्या जिल्हयातील रूग्णांसाठी ऊर भरुण येणारा जोएल देवधरे सारखा युवक खऱ्या अथाँने आपला वाटावा.

           कोविड संसर्ग विषाणू परिस्थितित अनेकजण मदतीस पुढे आलेत.आमदार,खासदार,मंत्री,पदाधिकारी यानी शाशनाचे फंडातून रूग्णांसाठी सुविधा केल्यात पण त्यापेक्षा  नाव करण्यासाठी माेठी धडपडही केली.  देशाबाहेर असून,कुठलाही स्वाथँ न ठेवता जाेएल देवधरे यांची मदत कशी आपलीशी वाटते.

Post a Comment

0 Comments