बल्लारपूरात पत्रकार दिन साजरा : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा बल्लारपूर, महाराष्ट्र पत्रकार संघ व पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने लोकोपयोगी कार्य
बल्लारपूर(राज्य रिपोर्टर) : लोकशाही व्यवस्थेचा चवथा स्तभं म्हणून पत्रकार ओळखला जातो निष्पक्ष व निर्भीड पत्रकारिता करून समाजातील शोषित, पीडित वंचीत समाजाला न्याय मिळवून देण्याचे कार्य पत्रकार करीत असतो आज 6 जानेवारी मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात येते या अनुषणगाने बल्लारपूर शहरात विविध पत्रकार संघटनांनी लोकोपयोगी उपक्रम राबवून पत्रकार दिन साजरा केला.
पुरीगामी पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले व तदनंतर बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयातील रूग्णांना तसेच निराश्रित जीवन जगणाऱ्याना ब्लेंकेट वितरण करण्यात आले यावेळी पुरोगामी पत्रकार संघाचे नरेंद्र सोनारकर, सुजय वाघमारे, प्रशांत रणदिवे, काशीनाथ सिह, गुलाब यादव यांच्यासह पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
तसेच तालुका पत्रकार संघाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मॉस्क, सॅनिटाईजर व उपयोगी वस्तूचे वितरण करण्यात आले यावेळी राहुल गायकवाड, प्रशांत वैरागडे, आलोक साळवे, सुधिर लोखंडे ई ची उपस्थिती होती.
महाराष्ट्र पत्रकार संघ तालुका शाखा बल्लारपूर च्या वतीने बल्लारपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात पत्रकार दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी विचारपीठावर मा.शोभाताई फडणवीस माजी आमदार, चंद्रपूर(मूल-सावली), मा. डॉ. रजनीताई हजारे ज्येष्ठ काँग्रेस नेत्या बल्लारपूर, पद्माकरजी पांढरे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष रमेश निषाद ई ची उपस्थिती होती यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल मान्यवरांचा सत्कार करण्यात आला बल्लारपूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार म्हणून मंगल जिवणे यांचा सत्कार तर ज्येष्ठ व नामांकित पत्रकार वसंत खेडेकर, पद्माकर पांढरे यांचा पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच मातोश्री वृद्धाश्रम येथील वृद्धांना पत्रकार संघाच्या वतीने ब्लँकेटचे वितरण करण्यात आले यावेळी मा.शोभाताई फडणवीस यांनी विचार व्यक्त करतांना पत्रकारांनी निष्पक्ष व निर्भीड पत्रकारिता करतांना समाजातील वंचीत, शोषित, पीडित घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा तसेच कुटुंबीयांनी दुरावलेल्या निराश्रित व्यक्तींना आधार देण्याचा प्रयत्न करावा व आपल्या जीवनातील प्रत्येक सुख व दुःखाचे क्षण या निराश्रित व्यक्तीसोबत साजरे करावे असे आवाहन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने मा.शोभाताई फडणवीस, मा.रजनीताई हजारे यांच्या हस्ते कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच सुधीरभाऊ फॅन्स क्लब बल्लारपूर च्या वतीने ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, पद्माकर पांढरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला मान्यवर म्हणून नगरसेवक श्री अरुण वाघमारे, श्री स्वामी रायबरम, श्री अजय दुबे यांची उपस्थिती होती तर या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रमेश निषाद, अजय रासेकर, प्रा.विजय सोरते,परिष मेश्राम, विकास राजूरकर, ज्ञानेन्द्र आर्य, देवेंद्र झाडे, प्रशांत भोरे, विवेक गडकर, घनश्याम बुरडकर ई चे सहकार्य लाभले त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा बल्लारपूर च्या वतीने नगर परिषद प्रांगणात असलेल्या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकालगत आचार्य बाळशास्त्री जांभेकर व आधुनिक भारताच्या पत्रकारितेचे जनक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रजवलन करण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष मुन्ना खेडकर, मनोहर दोतपल्ली, विशाल डुंबेरे, दिपक भगत, देवानंद देशभ्रतार, राजू राठोड, धनंजय पांढरे, वसंत मुन, शितल बेताल, श्रीनिवास सिंगाराव, विजय माटे, गणेश टोंगे ई ची उपस्थिती होती.
0 Comments