महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा बल्लारपूर च्या वतीने पत्रकार दिन साजरा
बल्लारपूर(राज्य रिपोर्टर) : मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा 6 जानेवारी रोजी जयंती ही पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो तसेच आधुनिक भारताच्या पत्रकारितेचे जनक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा बल्लारपूर च्या वतीने बल्लारपूर नगर परिषदेच्या प्रांगणात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकलगत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला तालुकाध्यक्ष मुन्ना खेडकर व कार्याध्यक्ष मनोहर दोतपेल्ली यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रजवलन करण्यात आले.
तदनंतर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार व दीपप्रजवलन करून अभिवादन करण्यात आले व पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष मुन्ना खेडकर, कार्याध्यक्ष मनोहर दोतपेल्ली, विशाल डुंबेरे, दिपक भगत, देवानंद देशभ्रतार, राजू राठोड, धनंजय पांढरे, वसंत मुन, श्रीनिवास सिंगाराव, शितल बेताल, विजय माटे, गणेश टोंगे ई ची उपस्थिती होती
0 Comments