घुग्घुस काँग्रेस कार्यलयात संविधान दिन संपन्न
घुग्घुस(राज्य रिपोर्टर) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय संविधानाच्या निर्मिती करिता मसुदा समिती निर्माण करण्यात आली.
या समितीने तयार केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने मंजूर केल्यामुळे हा दिवस संविधान दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो.या दिनाचे औचित्य साधून घुग्घुस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूरेड्डी यांनी काँग्रेस कार्यलयात संविधान दिन साजरा केला .
याप्रसंगी संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान उदघोषणेचे सामूहिक वाचन केले व संविधान रक्षणाची शपथ घेतली. याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, अजय उपाध्ये, शहजाद शेख,संजय कोवे, रोशन दंतलवार, सुनील पाटील, अंकुश सपाटे, रणजित राखुंडे,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.



0 Comments