रामनगर पोलिसांनी केले सायकल चोरांना जेरबंद
चंद्रपूर (राज्य रिपोर्टर) : पो.स्टे. रामनगर हद्दी मधुन सन 2019 ते 2020 मgध्ये चोरीस गेलेल्या सायकल चे गुन्ह्याचा छडा लावण्यात रामनगर पोलिस स्टेशन च्या गुन्हे शोध पथकास यश आले असुन आरोपी नामें अब्दुल वहीद अब्दुल हमीद शेख,वय.53वर्ष,रा.चंडीका वार्ड भद्रावती यास ताब्यात घेवुन त्याचे कडुन पो.स्टे.रामनगर येथे दाखल असलेले अपराध क्र.1) 529/200 कलम 379 भादवी,२) 318/2020 कलम 379 भादवी,3)603/2020 कलम 379 भादवी,4) 833/2019 कलम 379 भादवी,5) 1513/2019 कलम 379 भादवी,63/2019 कलम 379 भादवी गुन्ह्यात चोरीस गेलेल्या एकुण 8 सायकल कि.50,000/- रू चा माल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. उप विभागीय पोलिस अधीकारी श्री.शिलवंत नांदेडकर सा. व पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश हाके सा. यांचे मार्गदर्शनाखाली 1) सपोनी संतोष दरेकर 2) सफौ/824 प्रभुदास माहुलीकर,3) पोहवा/2110 आनंद परचाके,4) पोहवा/1711 गजानन डोहीफोडे,5)नापोका/991 शंकर येरमे,6)नापोका/2361 रामभाऊ राठोड,पोका/917 निलेश मुडे,पोका/2438 माजीद पठाण यांनी पार पाडली.



0 Comments