राजुरा पोलिसांनी बोगस चोर बीटी बियाणे पकडले


राजुरा पोलिसांनी बोगस चोर बीटी बियाणे पकडले 

राजुरा(राज्य रिपोर्टर)राकेश कलेगुरवार : चंद्रपूर – यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असतात. त्याच अनुषंगाने शेतकर्‍यांनी कापसाची लागवड केली.शेतकर्‍यांच्या ह्या गरजेचा फायदा व्यापारी मोठ्या प्रमाणात घेत असतात. त्यामुळे चोर बीटी बियाण्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालतो. काल दिनांक 4 जुलै 2020 रोजी राजुरा पोलीस स्टेशन हद्दीत अवैधपणे चोर बीटी बियाण्यांची वाहतुक करताना एका युवकास पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे घेतलेल्या झडती दरम्यान मुद्देमालासह अटक केली आहे.
 आदेश - 24, काव्या - 25, राशी - 19 या नावे बोगस चोर बीटी बियाणे असे एकूण पाकिटे 68 असा एकूण  रक्कम 51000 चे बोगस बियाणे जप्त करण्यात आले व आरोपी प्रफुल्ल मनोहर गिरसावळे वय वर्षे 31 यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू आहे. यावेळी श्री. नरेंद्र कोसुरकर पोलीस निरीक्षक राजुरा, श्री. गोविंद मोरे उपविभागीय कृषी अधिकारी राजुरा, श्री. प्रशांत साखरे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजुरा, श्री. गुलाब कडलग तालुका कृषी अधिकारी राजुरा, श्री. चेतन चव्हाण मंडळ कृषी अधिकारी देवाडा, संपत पुलीपाका पोलीस शिपाई व प्रवीण उवरे पोलीस शिपाई उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments