महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा बल्लारपुरच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार मा. वसंत खेडेकर यांच्या 75 व्या वाढदिवस साजरा
बल्लारपुर,(राज्य रिपोर्टर) : बल्लारपुर शहरातील अनेक पत्रकाराना नेहमी मार्गदर्शन करणारे व गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारीतेच्या व चित्रपट समीक्षकाच्या माध्यमातुन वृत्तपत्रातुन आपली भूमिका मांडनारे
आपल्या सर्वांचे लाडके (काकाजी) वसंत खेडेकर ज्यांचे नेहमी लोकमत वृत्तपत्रातुन लेख प्रकाशित होतात अशा काकाजीच्या 75 व्या वाढदिवसाचे ओचित्य साधुन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा बल्लारपुरच्या वतीने पुष्प देवून व केक कापुन स्वागत करण्यात आले.
यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी काकाजीच्या घरी जावुन सत्कार केला यावेळी प्रामुख्याने मुन्ना खेड़कर, मनोहर दोतपल्ली, विशाल डुम्बेरे, राजुभाऊ राठोड़, देवानंद देशभ्रतार, दिपक भगत, धनंजय पांढरे, वसंत मून, श्रीनिवास सिंगाराव, शितल बेताल ई ची प्रामुख्याने उपस्थिति होती.





0 Comments