म.रा. मराठी पत्रकार संघा तर्फे कोरोना योद्धांचा सत्कार
आरोग्य विभाग व पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार.
एकशे पाच कोरोना योद्धांचा सत्कार.
वरोरा ता.बा.(राज्य रिपोर्टर) :लॉकडाऊन काळात सातत्याने लढत असलेल्या वरोरा शहरातील विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडीकल कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी,नगरपरिषद कर्मचारी, अधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते, तथा पोलीस कर्मचारी आदी कोरोना योद्धा प्रति महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई शाखा- वरोरा यांच्या वतीने प्रत्यक्ष भेटीद्वारे कृतज्ञता व्यक्त करून त्याना शालश्रीफळ व गौरव पत्र तथा भेट वस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले.
कोविड १९विषाणू च्या महामारी संकटाच्या विरोधात लढा देण्याचे आव्हानात्मक कार्य बहुतांश कर्मचारी कोरोना योद्धांनी हाती घेतले आहे. या कठीन काळात कोरोना योद्धांनी दाखविलेला उत्साह समाजसेवक म्हणून प्रशंसनीय आहे. यासाठी त्यांना कौतुकाची थाप देण्याच्या उद्देशाने महा.राज्य मराठी पत्रकारांच्या वतीने वरोरा येथील नगर परिषद, उपजिल्हा रुग्णालय, पोलीस स्टेशन मध्ये एका छोट्याखानी कार्यक्रमाचे आयोजन करुन१०५ कोरोना योद्धांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ,व गौरवपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.त्यात प्रामुख्याने नगरपरिषद चे सुनील बल्लाळ, डॉ. प्रकाश कोटेचा,आरोग्य निरीक्षक भुषण सालवटकर,ऊमेश ब्राह्मणे, डॉ. दुधे,डॉ. पाटील, सुजीत वाटकर,गोविंद कुंभारे, नगराध्यक्ष अहेतेशामजी अली यांचा समावेश आहे.
नगर परिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष प्रा. महेश पानसे जिल्हाध्यक्ष सुनील बोकडे, जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र चोरडिया जिल्हासरचिटणीस राजु कुकडे, नगराध्यक्ष अहेतेशाम अली, मुख्याधिकारी सुनील बल्लाळ महा.राज्य मराठी पत्रकारसंघ शाखा वरोरा अध्यक्ष प्रा. वसंतराव माणुसमारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांचे पुष्पहारानी स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष अहेतेशामजी अली , मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांचे सह नगर परिषदेतील आरोग्य व ईतर विभागातील कोरोना योद्धांचा शालश्रीफळ व गौरव पत्र देऊन सत्कार करण्यात आला.तसेच वरोरा उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी सुद्धा शालश्रीफळ व गौरव पत्रदेऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय वरोरा पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक,उप निरीक्षक, पोलीस कर्मचारी महिला पोलीस या कोरोना योद्धांचा सत्कार वरोरा संघातील अध्यक्ष प्रा.वसंत माणुसमारे, कार्याध्यक्ष मुख्याध्यापक बाळु भोयर, सचिव प्रविण गंधारे व ईतर पदाधिकारी,सदस्य यांचे हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे कार्याध्यक्ष बाळू भोयर यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र मर्दाने यांनी केले तर अध्यक्ष प्रा. वसंतराव माणूसमारे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संघाचे सचिव प्रवीण गंधारे, उपाध्यक्ष डॉ. प्रवीण मुधोळकर, संयोजक प्रा.श्याम ठेंगडी, शाहीद अख्तर, मनोज श्रीवास्तव, हरीश केशवाणी, खेमचंद नेरकर, सतीश चव्हाण, प्रतीक माणूसमारे, प्रदीप कोहपरे मनीष भुसारी यांनी योगदान दिले.




0 Comments