आयुध निर्माणी चांदा येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकरिता चंद्रपुरात बाह्यरुग्ण विभाग सुरु करा


आयुध निर्माणी चांदा येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकरिता चंद्रपुरात बाह्यरुग्ण विभाग सुरु करा 

खासदार बाळू धानोरकर यांची अतिरिक्त संचालक यांच्याकडे केली मागणी 

चंद्रपूर (राज्य रिपोर्टर): आयुध निर्माणी चांदा सेवानिवृत्त कर्मचारी यांच्याकरिता केंद्रीय सरकारी स्वास्थ योजने द्वारा चंद्रपूर येथे बाह्यरुग्ण विभाग सुरु करणे गरजेचे आहे. त्याबाबतचे निवेदन खासदार बाळू धानोरकर यांना आयुध निर्माणी येथील निवृत्त कर्मचाऱ्यांनी दिले. त्यांची दखल घेत खासदार बाळू धानोरकर यांनी अतिरिक्त संचालक यांना भ्रमणध्वनी द्वारे व पत्र पाठवून चंद्रपूर येथे आयुध निर्माणी चांदा येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकरिता बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्याची मागणी केली आहे. 
चंद्रपूर येथे केंद्रीय सरकारी स्वास्थ योजने द्वारा चंद्रपूर येथे बाह्यरुग्ण विभाग सुरु करणे गरजेचे आहे. महत्वाची बाब म्हणजे आयुध निर्माणी चांदा येथील सुमारे १२०० सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. ते सध्या चंद्रपूर, वरोरा, भद्रावती येथे वास्तव्यास आहेत. सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे त्यांना औषध उपलब्ध होत नसल्याची त्यांनी निवेदनात तक्रार केली आहे. त्यासोबतच चंद्रपूर -  नागपूर बस सेवा सुरु नसल्याने ये - जा करणे देखील कठीण झाले आहे. त्यामुळे यांची गांभीर्याने दखल घेत तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना देखील या समस्या दूर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे.

Post a Comment

0 Comments