दिवसभरात 11 नवीन पॉझेटिव्ह ; 6 जणांना डिस्चार्ज


दिवसभरात 11 नवीन पॉझेटिव्ह ; 6 जणांना डिस्चार्ज

 24 तासात 180 रिपोर्ट निगेटिव्ह 

यवतमाळ, दि.30 (राज्य रिपोर्टर): यवतमाळ जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 11 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तर आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरुवातीला पॉझेटिव्ह आलेले सहा जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
आज (दि. 30) नव्याने पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये एक व्यक्ती दिग्रस येथील तर दहा जण नेर येथील आहे. यात नऊ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. सोमवारी जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्हची संख्या 51 होती. यात मंगळवारी 11 नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 62 वर गेला. मात्र आज रूग्णालयातून ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या सहा जणांना सुट्टी देण्यात आल्यामुळे जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 56 वर आली आहे.
गत चोविस तासात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 194 रिपोर्ट प्राप्तव झाले. यापैकी 11 पॉझेटिव्ह, 180 निगेटिव्ह तर तीन रिपोर्टचे निदान अचून नाही. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 279 झाली आहे. यापैकी 214 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधीत रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. सध्यास्थितीत आयसोलेशन वॉर्डात 61 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 4900 नमूने तपासणीकरीता पाठविले. यापैकी 4754 प्राप्त तर 146 अप्राप्त आहे. जिल्ह्यात एकूण निगेटिव्ह रिपोर्टची संख्या 4475 आहे.

Post a Comment

0 Comments