शेळीपालनाचे नि:शुल्क प्रशिक्षण

शेळीपालनाचे नि:शुल्क प्रशिक्षण

चंद्रपूर दि. 12 मार्च : बँक ऑफ इंडिया द्वारा संचालित स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था चंद्रपूर मार्फत 17  ते 26 मार्च 2020 पर्यंत 10 दिवसीय पुरुषांसाठी शेळीपालनाचे नि:शुल्क प्रशिक्षण होणार आहे. सदर प्रशिक्षण जुन्या डी. एड. कॉलेज च्या बाजूला, रेल्वे उड्डाण पुलाच्या खाली ,बल्लारशाह रोड, बाबुपेठ चंद्रपूर येथे सुरु होणार असून परिसरातील जास्तीत जास्त लोकांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.
या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थीचे वय 18 ते 45 वर्ष असावे, प्रशिक्षणार्थी कमीत कमी 8 वा वर्ग पास असणे आवश्यक आहे. इच्छुक असणाऱ्या   प्रशिक्षणार्थीनी टीसी, रहिवासी दाखला, रोजगार हमीच्या कामावर असल्यास त्याची प्रत, बीपीएल कार्ड, रेशन कार्ड, 3 फोटो,मतदान/ आधार कार्ड‌ या  कागदपत्रांची प्रत घेऊन स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे उपस्थित रहावे.
प्रशिक्षण   निःशुल्क असून राहण्याची तसेच जेवण्याची व्यवस्था निःशुल्क  आहे. अधिक माहितीसाठी आरसेटीचे संचालक मनोज सोनकुसरे (मो. ९४०३२३६२८५) आणि आरसेटी समन्वयक परीमल गांगरेड्डीवार  (मो. ९५०३९१९७६५)  यांच्याशी संपर्क साधावा. ग्रामीण भागातील लोकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments